NEET पेपरफुटीचं पुणे कनेक्शन, मांढरे मॅडम अडकल्या, असं कांड केलं की चक्रावून जाल!

NEET Exam Paper Leak : NEET पेपरफुटीचं प्रकरणाची मूळं आता पुण्यापर्यंत पोहोचली आहेत. नेमकं काय घडलंय? सविस्तर जाणून घेऊयात..

NEET

NEET

निलेश झालटे

17 May 2026 (अपडेटेड: 17 May 2026, 12:32 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

NEET पेपरफुटीचं पुणे कनेक्शन

point

मांढरे मॅडम अडकल्या, असं कांड केलं की चक्रावून जाल!

NEET Exam Paper Leak : NEET पेपरफुटी प्रकरणात नाशिक, लातूरनंतर आता पुण्यातून मोठी कारवाई केलीय. पुण्यातील एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका असलेल्या मनीषा मांढरेंना या प्रकरणात दिल्लीत अटक केलंय. NEET पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात CBIनं  मोठी कारवाई करत तपासाचा वेग वाढवला आहे. देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट पुण्याशी जोडले गेल्याने सीबीआयचे विशेष पथक पुण्यात दाखल झालं आणि मांढरे यांच्यापर्यंत पोहोचलं. आता या प्रकरणात लातूरचे पीव्ही कुलकर्णी मुख्य सूत्रधार आहेत असं सीबीआयनं म्हटलंय तर मनीषा मांढरेंना देखील मुख्य संशयित म्हणून अटक केलीय. मांढरेंपर्यंत सीबीआय टीम कशी पोहोचली, मांढरेंनी नेमकं काय कांड केलंय हेच जाणून घेऊयात. 

हे वाचलं का?

हेही वाचा : प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंड घासण्याचं हत्यार, कवटीचे हाड तुटले; प्रेमविवाहाचा भयानक अंत

तर आता या नीट पेपरफुटी प्रकरणात मुख्य संशयित प्राध्यापिका मनिषा मांढरेंना सीबीआयने दिल्लीतून अटक केली आहे. अटकेनंतर त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, आरोपीकडून अधिक पुरावे गोळा करण्यासाठी आणि तपासाची व्याप्ती वाढवण्यासाठी सीबीआयने पुण्यात धडक कारवाई सुरू केली आहे. पुण्यातील ‘गंगा ओशन’ या सोसायटीमध्ये सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आणि संशयितांच्या निवासस्थानी कसून झडती घेतली.

हेही वाचा : “बेरोजगार तरुण झुरळांप्रमाणे RTI कार्यकर्ते, सोशल मीडिया युजर्स बनतात अन्..”, सरन्यायाधीश काय म्हणाले?

मिळालेल्या माहितीनुसार, या सोसायटीमध्ये प्रा. मनिषा मांढरे आणि तिची सहकारी मनिषा वाघमारे वास्तव्यास आहेत. सीबीआयचे अधिकारी सध्या घरातील महत्त्वाची कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोबाईल फोन, लॅपटॉप तसेच डिजिटल पुरावे ताब्यात घेत असल्याची माहिती आहे.

याशिवाय, आर्थिक व्यवहारांच्या अनुषंगाने बँक खात्यांचे तपशील, व्यवहारांची नोंद आणि इतर आर्थिक कागदपत्रांचीही तपासणी केली जात आहे. या कारवाईतून पेपरफुटी प्रकरणातील आणखी मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आता आरोपी मनिषा मांढरे कोण आहेत तर त्या  NEET-UG 2026 परीक्षेच्या प्रक्रियेशी संबंधित होत्या. राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA कडून मांढरेंची तज्ज्ञ म्हणून नियुक्त करण्यात आली होती. त्यांना वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा पूर्ण अॅणक्सेस म्हणजे प्रश्नपत्रिकांपर्यंत पोहोचण्याची परवानगी होती असं समोर आलं आहे. पुण्यातील एका प्रसिद्ध महाविद्यालयात त्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.

आता त्यांनी काय केलंय तर एप्रिल 2026 दरम्यान मनीषा मांढरेंनी पुण्यातील मनिषा वाघमारे यांच्या माध्यमातून संभाव्य NEET परीक्षार्थींना गोळा केलं आणि पुण्यातील स्वतःच्या निवासस्थानी कोचिंगचे विशेष वर्ग घेतले असल्याची माहिती मिळतेय. यामध्ये मनीषा मांढरेंनी दोन विषयांमधले अनेक  प्रश्न समजावून सांगितले, सोबतच विद्यार्थ्यांना हे प्रश्न  लिहून घेण्यास सांगितलं. यापैकी बहुतेक प्रश्न 3 मे 2026 रोजी झालेल्या NEET UG 2026 च्या प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचं आढळून आलं आहे. 

दरम्यान ज्या कॉलेजमध्ये मांढरे कार्यरत होत्या त्या कॉलेजच्या प्रिन्सिपल यांनी समोर येऊन याबाबत स्पष्टीकरण दिलंय.  

गेल्या 24 तासांत CBI ने देशभरातील सहा ठिकाणी छापे टाकून अनेक महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट्स आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत.  "हे प्रकरण प्रचंड मोठं आणि संवेदनशील आहे, त्याप्रमाणे आम्हाला ज्याप्रकारे ऑफिशयल कम्युनिकेशन झाल्यानंतर आमच्या स्कूल एज्युकेशन लॉ प्रमाणे जी काही लीगल कारवाई आहे ती त्वरित करु", अशी देखील प्रतिक्रिया या कॉलेजकडून मिळालीय. 

NEET पेपरफुटी प्रकरणात सीबीआय प्रचंड अॅक्शन मोडवर आहे. देशभरात अनेक ठिकाणी छापे आणि अटकसत्र सुरु आहे. त्यात महाराष्ट्रात याचं मोठं कनेक्शन समोर आल्यानं खळबळ उडालीय. आता पुण्यातील या कारवाईमुळे तपासाला नवे वळण मिळाले आहे. सीबीआयकडून पुढील काही दिवसांत आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इतर महत्त्वाच्या बातम्या

जळगाव : कोणी नसताना ZP शिक्षक विद्यार्थीनीला वर्गखोलीत बोलावायचा, अन्...