60 किमी प्रतितास वेगाने येताहेत वादळी वारे; विदर्भ, मराठवाड्यासह कुठे धडकणार?

मुंबई तक

03 Jun 2026 (अपडेटेड: 03 Jun 2026, 09:45 AM)

महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसणार आहे. हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट या भागांना दिला आहे.

Maharashtra Weather

Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

60 किमी प्रतितास वेगाने येताहेत वादळी वारे

point

विदर्भ, मराठवाड्यासह कुठे धडकणार?

Maharashtra Weather : राज्यातल्या अनेक भागांमध्ये सध्या अवकाळी पाऊस बरसल्याने नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. सॅटेलाईट इमेजचा अंदाज घेतला असता, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे (कमी दाबाचे क्षेत्र) महाराष्ट्रात ढगांची दाटी झाली आहे. याचा प्रभाव प्रामुख्याने विदर्भ आणि किनारपट्टीच्या भागांवर दिसून येत असून, पुढील काही दिवस राज्यात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि रिमझिम ते मुसळधार स्वरूपाच्या प्री-मान्सून पावसाची शक्यता आहे. दरम्यान, उत्तर भारतातही मुसळधार पाऊस सुरू असून, राजस्थानमध्ये आलेल्या धुळीच्या वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्रात प्री-मान्सून गती घेणार

मान्सूनच्या आगमनाबाबत बोलायचे झाल्यास, साधारण 16 ते 17 मे दरम्यान अंदमान निकोबारमध्ये दाखल झालेला मान्सून 1 जूनपर्यंत केरळमध्ये येणे अपेक्षित होते. मात्र, 26 मे आणि त्यानंतर 1 जूनची तारीख उलटूनही केरळमध्ये मान्सून अद्याप दाखल झालेला नाही. याचा महाराष्ट्राच्या हवामानावर काय परिणाम होईल, याबाबत हवामान खात्याने अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र, हवामान अभ्यासक आत्रेय शेट्टी यांच्या मते, बाष्पयुक्त पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे 1 ते 4 जून दरम्यान महाराष्ट्रात पूर्व मान्सूनच्या (प्री-मान्सून) हालचाली अधिक तीव्र होतील आणि पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढेल.

हे ही वाचा : ‘भाजप शिवसेनेला संपवेल..’,शिंदेंचा आणखी एक आमदार भडकला; काय घडलं?

कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची स्थिती 

कोकण, मुंबई (MMR) आणि गोव्यात समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे प्रामुख्याने रात्री किंवा पहाटेच्या सुमारास हलका ते मध्यम पाऊस पडेल. पुण्यातही दुपारपासून मध्यरात्रीपर्यंत हलक्या पावसाची शक्यता आहे. या आठवड्याच्या शेवटी दक्षिण कोकण आणि गोव्यात मान्सूनच्या आगमनामुळे पाऊस सलग स्वरूप धारण करेल. ढगाळ वातावरणामुळे राज्याचे कमाल तापमान नियंत्रणात राहील; मुंबई व कोकणात 33 ते 35 अंश, तर मध्य महाराष्ट्र, खानदेश व मराठवाड्यात पारा 34 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान असेल. विदर्भात उष्णतेपासून मोठा दिलासा मिळून तापमान 36 ते 38 अंशांपर्यंत खाली येईल आणि मराठवाडा-विदर्भात दुपारपूर्वी हलक्या पावसाच्या सरी बरसतील.

हे ही वाचा : पत्नी आणि पोलीस उपनिरीक्षकाच्या कथित अनैतिक संबंधामुळे पोलीस कर्मचाऱ्याने केले नको ते?

जिल्हानिहाय अलर्ट आणि 5 जूनपर्यंतचा हवामान अंदाज

हवामान खात्याने विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर तसेच नाशिक, पुणे, सातारा आणि कोकणातील जिल्ह्यांना पावसाचा 'येलो अलर्ट' दिला आहे. 3 जून रोजी विदर्भासह नंदुरबार, धुळे, नाशिक आणि पालघर ते सिंधुदुर्गपर्यंतच्या किनारपट्टीला येलो अलर्ट असेल. 4 जून रोजी देखील विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचे हे वातावरण कायम राहील. मात्र, 5 जूनपासून पावसाचा जोर काहीसा ओसरणार असून केवळ रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, तर विदर्भाला 5 जून रोजी पावसाचा कोणताही धोका असणार नाही.