Maharashtra Weather : राज्यात पावसाचा जोर कमी अधिक जाणवण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे, तर काही भागांत पावसाची मध्यम स्थिती जाणवण्याची अधिक शक्यता आहे. तर काही भागांत विजांसह पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. अशातच जाणून घ्या 27 ऑगस्ट 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : गर्लफ्रेंडला पास करण्यासाठी बॉयफ्रेंडनं फोडला पेपर, नंतर दोघांचा ब्रेकअप
कोकण
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीये. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविलेला आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीये. तर नाशिक घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. अहिल्यानगर जिल्ह्यात हलक्या स्वरुपाची पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यांत विजांसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, धाराशिव आणि बीडमध्ये विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. लातूर, हिंगोली आणि नांदेड या ठिकाणी हलका ते मध्यम पावसासह विजांचा कडकडाट जाणवण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : योजनेच्या पैशांवरून नवरा-बायकोत वाद, पतीनं पत्नीची जीभ तोडली
विदर्भ
विदर्भ विभागातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत हवामान विभागाने कोणताही अंदाज वर्तविलेला नाही.
ADVERTISEMENT












