Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांमध्ये 29 सप्टेंबर रोजी विविध उपविभागांनुसार पावसाचं प्रमाण असल्याचा हवामान विभागाने अंदाज जारी केला आहे. तर काही ठिकाणी राज्यातील विविध क्षेत्रानुसार हवामान विभागाचा अंदाज बदलणार असल्याची शक्यता आहे, त्याची एकूण माहिती ही पुढील प्रमाणे नमूद करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुंबईची खबर: देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रोजेक्टचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण! ‘या’ स्थानकांदरम्यान बोगद्याचं बांधकाम अन्...
कोकण विभाग :
कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गाचा समावेश होतो. यापैकी रायगड जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. रायगड जिल्ह्यात हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही काही अंशी तशीच परिस्थिती बघायला मिळण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्र विभागात बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्याच्या उत्तर भागात काही ठिकाणी हवामान विभागाने अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या विभागात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर (अहमदनगर), पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. यापैकी धुळे, नंदूरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगलीत हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
मराठवाडा :
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. या विभागातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
हे ही वाचा : लेकीनं पाकिटातून 500 रुपये घेतले, वडिलांना कळताच शेतात नेलं अन् भयानक कट रचत नको तेच...
विदर्भ :
विदर्भ विभागातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर जिल्ह्यांचा समावेश होतो. या एकूण जिल्ह्यात हवामान विभागाने मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
ADVERTISEMENT
