लेकीनं पाकिटातून 500 रुपये घेतले, वडिलांना कळताच शेतात नेलं अन् भयानक कट रचत नको तेच...

मुंबई तक

Crime news : मुलीने आपल्याच वडिलांच्या पाकितातून 500 रुपये घेतल्याने वडिलांनी मुलीला शेतात नेलं आणि त्यानंतर तिची हत्या केली, नेमकं काय घडलं?

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वडिलांनी मुलीसोबत केलं नको तेच

point

नेमकं काय घडलं?

Crime news : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये मन हेलावून टाकणारं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. वडिलांनी स्वत:च्याच निष्पाप लेकीला गळा दाबून तिची हत्या केली. वडिलांनी आपल्या मुलीची हत्या का केली असावी? असा प्रश्न निर्माण झाला असेलच. त्या हत्येमागेचं कारण आता समोर आलं आहे. तिने तिच्या वडिलांच्या पाकिटातून परवानगीशिवाय 500 रुपये काढून घेतले. यामुळे वडिलांची सटकली आणि लेकीला मारण्याचा भयानकपणे कट रचला. संबंधित प्रकरणात आता पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी मृतदेह हा ताब्यात घेतला आणि तपासास सुरुवात केली, दरम्यान ही घटना बीचौला येथील आहे. मृत मुलीचं नाव सोनम असे होते, तर वडिलांचं नाव अजय शर्मा असे आहे.

हे ही वाचा : नात्याला काळीमा! 7 वर्षाच्या लेकाची आईकडे चिकनची मागणी, महिलेची सटकताच पोटच्या लेकराचीच केली हत्या, घटनेनं पालघर हादरलं

नेमकं काय घडलं? 

पोलिसांनी सांगितलं की, मृत मुलगी ही इयत्ता सातवीत शिक्षण घेत होती. शुक्रवारी दुपारी 4 वाजताच्यादरम्यान, शाळेचा गणवेश परिधान केलेल्या एका मुलीचा मृतदेह आढळल्याचं वृत्त मिळालं. बुलंदशहर पोलीस ठाणे परिसरातील एका पुलाखाली झुडपात मृतदेह आढळला. संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रकरणाचा तपास केला. मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि नंतर ओळख पटवण्यात आली.

स्कार्फने गळा दाबून हत्या

या प्रकरणाच्या तपासादरम्यान, सोनम गुरुवारी शाळेत गेल्याचं उघड झालं आहे. तिचे वडील अजय शर्मा दुपारी तिला शाळेत घेण्यासाठी गेले असता, तिला घरी नेण्याऐवजी ते तिला शेतात घेऊन गेले. तिथे त्यांनी तिचा स्कार्फने गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह कालव्याजवळ फेकून दिला. वडिलांच्या महितीवरून पोलिसांनी मुलीच्या शाळेची बॅग शेतातून ताब्यात घेतली.

हे ही वाचा : तामिळनाडूमधील रॅलेत चेंगराचेंगरी होऊन 39 जणांचा मृत्यू, विजय थलापतीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

चौकशीदरम्यान उघड झालं की, मुलगी गेल्या काही दिवसांपासून घरुन पैसे घेत होती. त्यामुळे तिच्या पालकांमध्ये वारंवार वाद होत होती. हत्येनंतर, आरोपी वडिलांनी शाळेला खोटी माहिती दिली की, त्यांची मुलगी नातेवाईकांना भेटायला गेली आहे आणि पुन्हा ती तीन ते चार दिवस भेटायला येणार नाही. सुमन, आई म्हणाली की अजय तिला तिच्या मुलीकडे पाठवले. पोलिसांनी सांगितलं की, त्यांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतले आणि प्रकरणाचा तपास सुरु केला.

हे वाचलं का?

    follow whatsapp