Manoj Jarange : भुजबळांचा घणाघात, जरांगे पाटलांच उत्तर; म्हणाले, “कितीही कळप…”

भागवत हिरेकर

• 10:49 AM • 17 Nov 2023

Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal : मनोज जरांगे पाटील यांची सांगलीत सभा झाली. जरांगेंनी पुन्हा एकदा ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली.

Manoj jarange sangli speech, attacked on obc leaders

Manoj jarange sangli speech, attacked on obc leaders

follow google news

Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली अंबड शहरात ओबीसी मेळावा पार पडला. या मेळाव्यात अरे तुरे करत भुजबळांना मनोज जरांगे पाटलांवर टीकेचा घणाघात केला. यावेळी ओबीसी समाजातील वेगवेगळ्या पक्षातील नेते या मेळ्यावाला हजर होते. या मेळाव्यानंतर सांगलीत मनोज जरांगे यांची सभा झाली. या सभेच जरांगे ओबीसी मेळाव्याचा उल्लेख न करता पलटवार केला. ओबीसी मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या विविध जातीतींना कळप असं संबोधत जरांगे पाटलांनी उत्तर दिलं.

हे वाचलं का?

मनोज जरांगे पाटील सध्या काही जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी म्हणजे १७ नोव्हेंबर रोजी जरांगे पाटलांची सांगलीत सभा झाली. यावेळी बोलताना ते म्हणाले, “चारही बाजूने मराठ्यांना सगळ्यांनी घेरलं आहे. आपल्याला ते षडयंत्र तोडून काढायचं आहे. ही जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर आहे. सावध व्हा, गाफील राहू नका. वेढा चौहीबाजूने पडला आहे. ७० वर्षांपासूनचा वेढा तोडायचा आहे. आता एकजूट दाखवण्याची गरज आहे. एकत्र या. ज्यांना आरक्षण असेल आणि ज्यांना नसेल अशा दोन्ही मराठा बांधवांनी एकत्र यावं. कारण, आता बिगर कामाचे कळप एकत्र यायला लागले आहेत.”

हे ही वाचा >> ‘मराठा समाजावर तुम्ही…’, गोपीचंद पडळकरांचा नाव न घेता पवारांवर हल्लाबोल

“कितीही कळप एकत्र येऊद्या, या राज्यात ५०-६० टक्के मराठा आहे. टेन्शन घ्यायचं काम नाही. सांगलीतून एकच आवाहन आहे की मराठा समाजाने जात वाचवणं गरजेचं आहे. त्यामुळे आरक्षण असलेल्या आणि नसलेल्या मराठा समाजाने उद्यापासून आरक्षण मिळेपर्यंत ताकदीने एकजूट दाखवा”, असं आव्हान जरांगे पाटलांनी यावेळी केलं.

“आपल्यावर जातीला टाकलेला वेढा तोडायची जबाबदारी”

“आपल्याला आव्हान पेलायचं आहे. स्वतःच्या लेकराच्या हितासाठी, त्याला मोठं करण्यासाठी आपल्याला आव्हान पेलायचं आहे. आपली जात उद्ध्वस्त होता कामा नये. पोरांचं भवितव्य उद्ध्वस्त होता कामा नये. जातीवर रचलेले षडयंत्र आणि टाकलेला वेढा तोडायची जबाबदारी तुमच्यावर आजपासून आहे”, असं जरांगे पाटील उपस्थितांशी बोलताना म्हणाले.

“आमच्याकडे काय समुद्र आहे का?”, जरांगेंनी सांगितला मंत्र्यांसोबतचा किस्सा

“माझ्याकडे एक मंत्री आला होता. तो म्हणाला, तुम्हाला कुणबी म्हणून आरक्षणच देता येत नाही. मी म्हणालो नको देऊ. का देता येत नाही एवढं सांग? असं मी विचारलं. विदर्भातील मराठ्यांना आरक्षण दिलं काय कारण आहे? काय निकष लावला, तो म्हणला त्यांचा व्यवसाय शेती आहे. मी म्हणालो आमच्याकडे काय समुद्र आहे का, आम्ही काय होडग्या हाणतो का?”, असा किस्सा जरांगे पाटलांनी एका मंत्र्यासोबत झालेल्या संवादाचा सांगितला.

“त्याचं पोरग आपल्यासमोर वीन करून उभं राहिल अन् आपण…”

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “मी म्हणालो की नका देऊ आरक्षण, पण एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमची जात आरक्षणात गेली. कशाचा आधार घेऊन आत गेली हे मला सांगा. त्यांची जात रात्रीतच आरक्षणात गेली. कागद नाही, काही नाही. रात्रीत आरक्षण घेतलं आणि दुसऱ्या त्याचं पोरग नोकरीलाही लागलं. त्याचं पोरग वीन करू आपल्यासमोर उभं राहिलं. तुम्ही फक्त त्याच्या तोंडाकडे बघत राहिले की याने वीन कशी काय केली?”, असं म्हणत जरांगे पाटलांनी ओबीसीत समावेश करण्यात आलेल्या काही जातींबद्दल प्रश्न उपस्थित केला.

हे ही वाचा >> ‘नाना पाटेकरांचा चाहता, पण…’, टपली खालेल्या तरूणाने सांगितलं नेमकं काय घडलं?

“ज्यांना आरक्षण कळालं, ते रात्रीतून आरक्षणात गेले. आपल्याला आरक्षण कळायला ७० वर्ष गेली. ज्यादिवशी कळालं, त्यादिवशी राज्यात मराठ्यांची त्सुनामीच आली. जर ७० वर्षांपूर्वी मराठ्यांना आरक्षण दिलं असतं, तर या जगात सगळ्यात प्रगत जात म्हणून मराठा राहिली असती. यांनी जाणूनबुजून आरक्षण दिले नाही”, असा आरोप जरांगे पाटलांनी केला.

    follow whatsapp