Maratha Morcha : महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरंगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरु केले होते. त्यानंतर सरकारने अश्वासन देत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil) यांनी उपोषण मागे घेणे भाग पडले. सरकारने जर ठोस निर्णय घेतला नाही तर जरांगे पाटील आरक्षण (Reservation) मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता. जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन, रास्ता रोको करण्यात आला. नांदेड जिल्हयातही गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. मात्र आंदोलनातील युवकाने काल मराठा आरक्षणासाठी आत्महत्या (Suicide) केल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
सरकारला सुचक इशारा
मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्या समर्थनासाठी राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. काही ठिकाणी रास्ता रोको करुन सरकारला आरक्षणा देण्यासाठी सूचक इशाराही देण्यात आला.
हे ही वाचा >> लालबागच्या राजाच्या पायावर छत्रपतींच्या ‘राजमुद्रा’ने वाद! संभाजीराजे भडकले
आरक्षणासाठी आत्महत्या
याच प्रकारचे आंदोलन नांदेड जिल्ह्यातील कामारी गावामध्ये सुरु होते. या आंदोलनातील कार्यकर्ते सुदर्शन ज्ञानेश्वर देवराई कामरीकर या युवकाने मध्यरात्री 12 वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
कामारीमध्ये जोरदार उपोषण
नांदेड जिल्ह्यात करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली होती. या आंदोलनावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्यात सरकार अपयशी ठरले असल्याची भावना या आंदोलनप्रसंगी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर कामारीमध्ये उपोषणाला बसलेल्या युवकाने आत्महत्या केल्याने कामारीसह नांदेड जिल्हा आता हादरला आहे.
हे ही वाचा >> Mohmmad Siraj : मोहम्मद सिराजने दाखवला मनाचा मोठेपणा, श्रीलंकेच्या ग्राऊंड्समन्सना दिलं मोठं गिफ्ट
जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाला राज्य सरकारने अश्वासन दिले आहे. त्यानंतरही जरांगे पाटील यांनी सांगितले की, सरकारने जर निर्णय दिला नाही तर आपण पुन्हा बेमुदत उपोषणाला सुरुवात करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता तरी सरकार आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेणार का असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
ADVERTISEMENT
