Sangali Rape Case : सांगली जिल्ह्यात घडलेल्या गँगरेपच्या धक्कादायक घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे. येथील एका मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनीसोबत वर्गमित्रांनी आणि त्यांच्या एका मित्राने सामूहिक बलात्कार केला. पीडित आणि आरोपी एकाच मेडिकल कॉलेजमध्ये शिकतात. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, एमबीबीएस विद्यार्थीनीला तीन विद्यार्थी विनय विश्वेश पाटील (22), सर्वज्ञ संतोष गायकवाड (20) आणि तन्मय सुकुमार पेडनेकर (21) वानलेस्वाडी येथे राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीच्या रुमवर घेऊन गेले. चित्रपट पाहण्याच्या बहाण्याने पीडितेला त्या ठिकाणी नेण्यात आलं.
रुममध्ये पोहोचल्यावर या नराधमांनी पीडितेला कोल्ड ड्रिंकमध्ये अंमली पदार्थ टाकून प्यायला दिलं. तिला दारुही पाजली..पीडिता जेव्हा बेशुद्ध झाली, तेव्हा तिघांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला. काही वेळानंतर पीडित तरुणीला जाग आली, त्यानंतर तिने थेट विश्रामबाग पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला संतापजनक प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तातडीनं कारवाई करत तीन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
हे ही वाचा >> फलटणमधील धुमाळवाडीत पावसाचा हाहाकार, पूल वाहून गेला, रस्ताही पाण्यात, 35 गावांचा संपर्क तुटला
पोलिसांच्या तपासात समोर आलं की, अटक केलेल्या आरोपींपैकी दोघे जण विनय आणि सर्वज्ञ पीडितेचे वर्गमित्र आहेत. तिसरा आरोपी तन्मय त्यांचा मित्र आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत लवकरच आरोपपत्र दाखल करून आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथेही फेब्रुवारी महिन्यात एका 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. सहा नराधमांनी पीडितेवर दोनवेळा गँगरेप केला होता. त्यानंतर पीडितेला त्याच अवस्थेत सोडून आरोपी फरार झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्दा दाखल करून कारवाई केली होती.
हे ही वाचा >> दोन गाड्या, दोन पिस्तूल, चांदीची भांडी... वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
ADVERTISEMENT
