Monsoon Update : मान्सून यंदा काही दिवसांआधीच राज्यात दाखल झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. एकूण सहा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यात सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर मुंबईला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, उपनगरातील सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. तर पनवेल रेल्वे स्थानकाबाहेरही पाणी साचलेलं दिसत आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Monsoon Update : राज्यभरात पावसाचा कहर, 'या' सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
मुंबईसह काही उपनगरांमध्ये पावासाचा जोर कायम पाहताना दिसत आहे. परळ, दादर हिंदमाता तसेच पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर पावसाचे पाणी साचलं आहे. त्याचप्रमाणे काही घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे. यामुळे प्रवाशांना लोकलच्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यामुळे काही रहिवाशांना या पावसाचा त्रास सहन करावा लागत आहे. अशा स्थितीत मुंबईतील काही उपनगरांमधील रस्ते खचले आहेत.
त्याचप्रमाणे सायन पनवेल महामार्गावरही मोठ्या प्रमाणात पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं आहे. दरम्यान, पुढील काही तास हे मुंबईकरांसाठी फार महत्त्वाचे असणार आहेत. दरम्यान, पनवेलमध्ये सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास 82.4 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईतील मध्यरेल्वे खोळंबली असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा : मुसळधार पावसाचा लोकलवर परिणाम, मध्य आणि पश्चिम रेल्वे किती वेळ उशिरा?
मध्यरेल्वे खोळंबली
या पावसामुळे मध्य रेल्वे खोळंबली आहे. नोकरीसाठी प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना चांगलाच फटका बसला आहे. रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्मवर पाणी साचलं आहे. ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, ठाण्याहून कल्याणकडे जाणाऱ्या जलद लोकल रेल्वे आणि स्लो लोकल ही 15 मिनिटं उशिराने धावत आहे.
ठाणे रेल्वे स्थानकात काही इंडिकेटर बंद असल्याने चाकरमाण्यांना प्रवासाचा सामना करावा लागत आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे गाड्या उशीरने धावतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
ADVERTISEMENT
