Mansoon Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातलं होत. तब्बल 16 वर्षानंतर राज्यात 10-12 दिवसांआधीच 25 मे रोजी मान्सून दाखल झाला आहे. अशातच 26 मे रोजी पहाटेपासून पावसाने मुंबईत धुव्वादार बॅटींग केली आहे. ज्यात काही सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. अशातच आता राज्यातील असे काही जिल्हे आहेत त्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासून पावसाची बॅटींग! काय आहे दिवसभरासाठी हवामान अंदाज?
पुणे जिल्ह्यातील बारामती येथील निरा डावा कालवा फुटला आहे. तसेच दौंड तालुक्यातील पाटसमध्ये ढगफुटी सदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. तर सोलापूर जिल्ह्यालाही पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील नीरा आणि भीमा नदीच्या खोऱ्यातील पाणीपातळीत वाढ निर्माण झाली आहे.
तर पंढरपूरमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर ब्रिटीशकालीन असणारा पूल हा पाण्याखाली गेला आहे. यामुळे काही भागांमध्ये वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. तर काही मंदिरांना पाण्याचा वेढा आहे.
'या' जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी
दरम्यान, राज्यातील सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यात पुणे, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे कोकणातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकणातील समुद्रकिनारी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा : बारामतीमध्ये पावसाचं थैमान! निरा डावा कालवा फुटला, रहिवाशी भागांमध्ये घुसलं पाणी
पावसाचा मुंबई लोकलवर परिणाम
दरम्यान, मुंबईमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच लोकल ट्रेनवर त्याचा परिणाम होताना दिसतो. मध्य आणि लोकल ट्रेनच्या वेळेत बदल होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवाशांना काहीअंशी प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तर काही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तर काहींच्या जनावरांचे गोठे उडून गेले आहेत. तर काही शेतकऱ्यांची गुरे मृत्युमुखी पडलेली आहेत.
ADVERTISEMENT
