Video : बापरे! माऊथ फ्रेशनर खाल्ल्याने तोंडातून आलं रक्त

Mouth Bleeding After Consuming Mouth freshner : एका कुटुंबाला रेस्टॉरंटमध्ये जाऊन माऊथ फ्रेशनर खाण महागात पडलं आहे. कारण या कुटुंबियांच्या तोंडातून रक्त (Mouth Bleeding) आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

mouth bleeding after consuming mouth freshner khedki doula sector 90 gurugram hariyana

एका कुटुंबाला रेस्टॉरंटमध्ये जाऊन माऊथ फ्रेशनर खाण महागात पडलं आहे. कारण या कुटुंबियांच्या तोंडातून रक्त (Mouth Bleeding) आल्याची धक्कादायक घटना घडली होती.

प्रशांत गोमाणे

• 06:52 PM • 04 Mar 2024

follow google news

Mouth Bleeding After Consuming Mouth freshner : तुम्ही कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये जाऊन पोटभर जेवण केल्यानंतर वेटर तुम्हाला माऊथ फ्रेशनर ऑफर करत असतो. हा माऊथ फ्रेशनर खाल्ल्याने तुमच्या तोंडाची दुर्गंधी दुर होतेच आणि अन्न पचनही होते. त्यामुळे जास्तीत जास्त माऊथ फ्रेशनर (Mouth freshner) खाण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र आता एका कुटुंबाला रेस्टॉरंटमध्ये जाऊन माऊथ फ्रेशनर खाण महागात पडलं आहे. कारण या कुटुंबियांच्या तोंडातून रक्त (Mouth Bleeding) आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस (Police) करीत आहेत. (mouth bleeding after consuming mouth freshner khedki doula sector 90 gurugram harayana) 

हे वाचलं का?

हरीयाणाच्या गुरुग्राममध्ये ही घटना घडली आहे. या घटनेत अंकित कुमार नावाचा इसम त्याच्या बायको आणि मित्रांसह खेडकीदौला सेक्टर 90 मधील रेस्टॉरंटमध्ये पार्टी करण्यासाठी गेला होता. या रेस्टॉरंटमध्ये पाचही लोकांनी मस्त पार्टी केली. त्यानंतर सगळ्यांच पोटभर जेवण झाल्यानंतर वेटर त्यांना माऊथ फ्रेशनर ऑफर केले होते. हे माऊथ फ्रेशनर खाल्ल्यानंतर पाचही जणांची तब्येत बिघडल्याची घटना घडली होती.

हे ही वाचा : "शिवसेनेच्या उमेदवाराला पाडायचं अन्...", भाजपबद्दल कदमांचा मोठा गौप्यस्फोट

त्याचं झालं असं अंकित कुमारसह त्याची पत्नी आणि इतर तिन्ही मित्रांनी रेस्टॉरंटमधलं माऊथ फ्रेशनर खाल्लं होतं. हे माऊथ फ्रेशनर खाल्यानंतर 5 जणांच्या तोंडातून अचानक रक्त वाहू लागलं होतं. ही संपूर्ण घटना रेस्टॉरंटमध्येच घडली होती. मात्र या दरम्यान हॉटेलमधला एकही स्टाफ या ग्राहकांच्या मदतीला सरसावला नव्हता. त्यामुळे अंकित कुमार यांनी स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन पीडित कुटुंबियांना रूग्णालयात दाखल केले होते. सध्या या पाचही जणांवर रूग्णालयात उपचार सुरु आहे. 

दरम्यान या प्रकरणी आता अंकित कुमार यांनी रेस्टॉरंट मालकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.  या तक्रारीनंतर आता पोलीस ठाण्यात रेस्टॉरंट मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करीत आहे. 

    follow whatsapp