Govt Job: 'बँक ऑफ बडोदा'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! काय आहे पात्रता? अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू...

बँक ऑफ बडोदा (BOB) कडून 'आयटी प्रोफेशनल' पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत, बँकेत एकूण 441 पदांसाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

'बँक ऑफ बडोदा'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!

'बँक ऑफ बडोदा'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!

मुंबई तक

• 03:36 PM • 31 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

'बँक ऑफ बडोदा'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!

point

काय आहे पात्रता? अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू...

Govt Job: सरकारी बँकेत नोकरीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या उमेदवारांसाठी बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) कडून 'आयटी प्रोफेशनल' पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत, बँकेत एकूण 441 पदांसाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामधील 418 पदे नियमित म्हणजेच परमनंट असतील तर 23 पदे कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच कराराच्या आधारे भरली जातील. 

हे वाचलं का?

बँक ऑफ बडोदाच्या या भरतीसाठी 30 जानेवारी 2026 रोजी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 19 फेब्रुवारी 2026 पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच, अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवार अर्जाचं शुल्क भरू शकतात. आयटी क्षेत्राशी संबंधित वेगवेगळ्या पदांसाठी बँकेकडून भरती जाहीर करण्यात आली आहे. टेक्निकल क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे. 

पात्रता 

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कंप्यूटर सायन्स, माहिती तंत्रज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड कम्युनिकेशन या क्षेत्राशी संबंधित विषयात फूल टाइम डिग्री असणं आवश्यक आहे. यासोबतच, उमेदवारांकडे बीई (B.E), बीटेक (B.Tech), एमई (M.E), एमटेक  (M.Tech) किंवा एमसीए (MCA) ची डिग्री असणं गरजेचं आहे. पात्रतेसंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. 

वयोमर्यादा 

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पदानुसार उमेदवारांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. किमान 22 वर्षे आणि कमाल 32 ते 37 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, कॉन्ट्रॅक्ट बेस्ड पदांसाठी किमान 25 वर्षे आणि कमाल 40 वर्षे वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे. 

हे ही वाचा: आई घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, मुलगा होणार खासदार? पार्थ पवारांबाबत नेमकं काय घडतंय?

कशी होईल निवड? 

बँक ऑफ बडोदाच्या या भरतीसाठी वेगवेगळ्या टप्प्यांत उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. नियमित म्हणजेच परमनंट पदांसाठी ऑनलाइन परीक्षा आयोजित केली जाईल. या परीक्षेत उमेदवारांचे तांत्रिक ज्ञान, समज आणि योग्यता यांचं मूल्यांकन केलं जाईल.

तसेच, काही पदांसाठी उमेदवारांची निवड त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि कामाच्या अनुभवाच्या आधारे केली जाऊ शकते. उमेदवाराचे वर्तन, विचार करण्याची क्षमता आणि कामाची नीतिमत्ता तपासण्यासाठी काही पदांसाठी मानसोपचार टेस्ट देखील घेतल्या जाऊ शकतात.

त्यानंतर नियुक्त झालेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावलं जाईल. या मुलाखतीदरम्यान, उमेदवाराची पदासाठी त्यांची योग्यता आणि बँकेच्या आवश्यकतांचे पालन कसे करावे याचे मूल्यांकन केलं जाईल. 

हे ही वाचा: हिंगोली : 69 वर्षीय वृद्धाचा 9 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार! पीडितेला चॉकलेट खायला दिलं अन्...

कसा कराल अर्ज? 

1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 'बँक ऑफ बडोदा'च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
2. नंतर, Career किंवा Current Opportunities सेक्शनमध्ये जाऊन 'आयटी'शी संबंधित भरतीच्या लिंकवर क्लिक करा. यासाठी उमेदवारांना आधी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.  
3. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉगिन करा आणि अर्जात उमेदवाराची शैक्षणिक तसेच वैयक्तिक माहिती भरा. 
4. योग्य माहिती भरल्यानंतर, ओळखपत्र, जन्मतारखेचा पुरावा, पदवी प्रमाणपत्र आणि अनुभव प्रमाणपत्र यासारखी डॉक्यूमेंट्स अपलोड करणं आवश्यक आहे. अर्ज भरल्यानंतर, उमेदवारांना आपल्या प्रवर्गानुसार अर्जाचं शुल्क भरावं लागेल. 

    follow whatsapp