"बारामतीचे नाव 'अजितनगर' करा…" जालन्याच्या अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी!

अजित पवारांच्या विकासात्मक कार्याची आठवण कायम राहावी आणि त्यांना आदरांजली म्हणून बारामतीचे नाव 'अजितनगर' करण्यात यावं, अशी मागणी जालन्याच्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे.

अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी!

अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी!

मुंबई तक

• 01:35 PM • 31 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

"बारामतीचे नाव 'अजितनगर' करा…"

point

जालन्याच्या अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी!

Ajit Pawar Baramati: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. मात्र, अजितदादांनी पुणे जिल्ह्यातील बारामतीच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण विकासकामे केली आहेत. अजित पवारांच्या कार्यकाळात बारामतीचा कायापालट झाला असून आज बारामती एक आदर्श शहर म्हणून ओळखलं जाते. त्यांच्या या विकासात्मक कार्याची आठवण कायम राहावी आणि त्यांना आदरांजली म्हणून बारामतीचे नाव 'अजितनगर' करण्यात यावं, अशी मागणी जालन्याच्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. 

हे वाचलं का?

अखिल भारतीय मराठा महासंघाची ठाम मागणी 

जालन्याच्या अखिल भारतीय मराठा महासंघाने केलेल्या  या मागणीसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. अजित पवारांनी बारामतीत विविध प्रकल्प आणून शहराच्या विकासाला गती दिली आहे. त्यामुळे बारामतीचे नाव 'अजितनगर' करावे, अशी ठाम मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने केल्याची माहिती आहे. 

हे ही वाचा: अजितदादांसोबत किती बैठका झाल्या? जयंत पाटलांचा मोठा खुलासा, मात्र 'त्या' एका प्रश्नाचं उत्तर टाळलं

अजितदादांच्या निधनानंतर एनसीपी (अजित पवार गट) चं नेतृत्व... 

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर एनसीपी (अजित पवार गट) मध्ये नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. आज (31 जानेवारी 2026) सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. सुनेत्रा पवार या राज्यसभा खासदार असून, आज दुपारी 2 वाजता एनसीपीच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांना विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवडले जाणार आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर (बारामती येथील विमान दुर्घटनेत) हे राजकीय संक्रमण घडत आहे. 

    follow whatsapp