Mumbai Local Updates : मुंबईत सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. नुकत्याच समोर आलेल्या अपडेटनुसार मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ताशी 50 ते 60 किमी वेगानं वारा वाहण्याचा अंदाज असून, मुंबईत पुढील 3 ते 4 तास अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे बाहेर पडताना काळजी घेण्याचं हवामान विभागाचं आवाहन आहे.
ADVERTISEMENT
लोकल ट्रेन किती लेट?
मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर कल्याणच्या दिशेने जाणारी धीम्या मार्गावरील वाहतूक 15 मिनिटे उशिराने, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी जलद वाहतूक 10 मिनिटे उशिराने सुरू आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूकही 15 मिनिटे उशिराने धावत असून, हार्बर मार्गावरील गाड्या 7-8 मिनिटे उशिराने सुरू आहेत. मात्र, सतत पाऊस सुरू राहिल्यास यामध्ये आणखी बदल होऊन, लोकल आणखी लेट होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा >> मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासून पावसाची बॅटींग! काय आहे दिवसभरासाठी हवामान अंदाज?
हवामान खात्याच्या माहितीनुसार, सकाळी 7:30 पर्यंतच्या 21 तासांत मुंबईत 71.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. उपनगरांत 17.5 मिमी, सायनमध्ये 43 मिमी, तर मुंबई विमानतळ परिसरात 33 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे रस्ते वाहतूक आणि रेल्वे सेवांवर परिणाम झाला असून, प्रवाशांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
