मुंबई : मिरा रोड परिसरात भीषण आग, गोडाऊनसह रहिवासी इमारतीचे मोठे नुकसान

Mira Road Fire : मिरा रोड परिसरातील मुळशी कंपाउंडच्या पाठीमागे असलेल्या अमिष पार्क बिल्डिंगजवळील एका गोडाऊनला काल रात्री सुमारे 8.45 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत गोडाऊनसह शेजारील अमिष पार्क इमारतीलाही फटका बसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Mira Road Fire

Mira Road Fire

मुंबई तक

• 08:37 AM • 25 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई : मिरा रोड परिसरात भीषण आग

point

गोडाऊनसह रहिवासी इमारतीचे मोठे नुकसान

Mira Road Fire, प्रवीण नलावडे :  मिरा रोड परिसरातील मुळशी कंपाउंडच्या पाठीमागे असलेल्या अमिष पार्क बिल्डिंगजवळील एका गोडाऊनला काल रात्री सुमारे 8.45 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत गोडाऊनसह शेजारील अमिष पार्क इमारतीलाही फटका बसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हे वाचलं का?

घरातील साहित्य जळून खाक

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित गोडाऊनमध्ये सोफा व लग्न समारंभासाठी वापरण्यात येणारे फर्निचर साठवण्यात आले होते. अचानक लागलेल्या आगीने काही क्षणातच विक्राळ रूप धारण केले. गोडाऊनमधील ज्वलनशील साहित्यामुळे आग झपाट्याने पसरत गेली. आगीची तीव्रता इतकी होती की, शेजारील अमिष पार्क इमारतीपर्यंत ज्वाळा पोहोचल्या. त्यामुळे इमारतीतील काही घरांनाही आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच इतर साहित्य जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे.

हे ही वाचा : भोंदूबाबा खरातसोबतची 'ती' डील तरीही उपजिल्हाधिकारी भांडे-पाटलांची क्रीम खात्यात बदली!

मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. सुदैवाने या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे ही वाचा : Personal Finance: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI ने आणला नवा नियम