सोलापूरमध्ये उन्हाच्या कडाक्यात थंडावा मिळवण्यासाठी जिवलग मित्र पोहायला गेले, तलावात बुडून दोघांचा दुर्दैवी अंत

Solapur News : सोलापूरच्या हिप्परगा तलावात दुर्दैवी घटना घडल्याचे वृत्त आहे. दोन जिवलग मित्र पोहायला गेल्याने त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त आहे. सध्या उन्हाळा ऋतू सुरु असून थंडावा मिळवण्यासाठी तरुण तलावात पोहायला गेले आणि होत्याचं नव्हतं झालं.

solapur news

solapur news

मुंबई तक

• 01:48 PM • 24 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

उन्हामुळे दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

point

कपडे तलावाच्या काठावरच आढळल्याने नातेवाईकांना भलताच संशय

Solapur News : विजय बाबर - सोलापूरच्या हिप्परगा तलावात दुर्दैवी घटना घडल्याचे वृत्त आहे. दोन जिवलग मित्र पोहायला गेल्याने त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त आहे. सध्या उन्हाळा ऋतू सुरु असून थंडावा मिळवण्यासाठी तरुण तलावात पोहायला गेले आणि होत्याचं नव्हतं झालं. सोलापूर शहरासह मृतांच्या परिसरात शोककळा पसरली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'वकिलाने गाडीचा दरवाजा लावला अन्...' बोटावर जखम कशी झाली? सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण; नेमकं काय म्हणाले?

उन्हामुळे दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

घडलेल्या घटनेनुसार, शेळगी परिसरातील जोशी गल्लीत राहणारा भारत शिवशंकर सुरवसे (वय 28) आणि त्याचा मित्र गिरीश हे दोघे सोमवारी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास फिरण्यासाठी सोलापूरमधील प्रसिद्ध हिप्परगा तलाव परिसरात गेले असता, वाढत्या उन्हामुळे दोघांनाही पाण्यात पोहोण्याचा दोघांनाही मोह आवरला नाही. त्यांनी तलवाच्या काठी कपडे काढून उत्साहाने पाण्यात उडी मारली. 

कपडे तलावाच्या काठावरच आढळल्याने नातेवाईकांना भलताच संशय

दोघेही मित्र पुन्हा घरी न परतल्याने त्यांचे कपडे तलावाच्या काठावरच आढळल्याने नातेवाईकांना भलताच संशय आला. सायंकाळी 6 वाजण्याच्यासुमारास तरुणांच्या मृत्यूची माहिती समोर आली. मित्रांनी तातडीने तलावाकडे धाव घेतली होती. 

हे ही वाचा : अनामिकेला जखम कशी झाली? स्पष्टीकरण देण्यासाठी रुपाली चाकणकरांनी थेट व्हिडीओ केला पोस्ट

स्थानिकांनी नागरिकांच्या मदतीने शोध सुरु ठेवला असता, भारत सुरवसे यांचा मृतदेह हाती लागला, पोलिसांनी तो मृतदेह तातडीने शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. तर दुसरा तरुण गिरीशचा शोध सुरु असून मच्छिमार आणि स्थानिक प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत.