Maharashtra Weather : राज्यात अवकाळी पावसाची अधिक शक्यता आहे. तर बहुतेक भागांत कोरड्या हवामानाचा अंदाज राहील. परंतु मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे काही भागांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस, विजांचा कडकडाट आणि 30-50 किमी/तास वेगाने वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. जाणून घेऊयात 23 मार्च रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : MBBS तरुणीने मांजर पाळली, कुटुंबीयांनी घातला वाद, अखेर महिला डॉक्टरनं उचललं टोकाचं पाऊल
कोकण :
कोकण विभागात रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश होतो. यापैकी पालघर, आणि रत्नागिरीत उष्ण आणि दमट हवामानाची अधिक शक्यता आहे. तसेच ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यात हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी केला आहे, तर सिंधुदुर्गात कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदूरबार या जिल्ह्यांचा समावेश होतो. यापैकी धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, जळगावात कोरडं हवामानाचा अंदाज आहे. तसेच अहिल्यानगर, पुणे आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर सातारा, सांगली आणि सोलापूर येथे पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला.
मराठवाडा :
मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या तीन जिल्ह्यांत हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. तसेच बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात हवामान विभागाने हलक्या पावसाचा इशारा दिला, तर लातूरमध्ये हवामान विभागा पावसाचा यलो अलर्ट जारी केला.
हे ही वाचा : नांदेड :विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून भोंदूबाबाचा अत्याचार, बाबा खरातसारखेच आणखी एक प्रकरण
विदर्भ :
नागपूर, अमरावती,चंद्रपूर, अकोला,वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा गोंदिया, वाशिम, गडचिरोली या एकूण 11 जिल्ह्यांचा समावेश होतो. कोणत्यात जिल्ह्यात तसा विशेष इशारा दिला नाही.
ADVERTISEMENT











