MBBS तरुणीने मांजर पाळली, कुटुंबीयांनी घातला वाद, अखेर महिला डॉक्टरनं उचललं टोकाचं पाऊल

मुंबई तक

Suicide News : एका MBBS डॉक्टरने टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव टी. प्रिंसी उर्फ श्रष्टा (वय 23) असे आहे. आत्महत्या केल्याचं कारण समोर आलं आहे. मांजरीचे पालन करण्यावरून तिचा तिच्या कुटुंबीयांशी वाद झाला, याच वादातून तिने टोकाचं पाऊल उचललं.

ADVERTISEMENT

Suicide News
Suicide News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मांजरीवरून आई आणि लेकीमध्ये वाद

point

गळफास घेऊन प्रिन्सीनं जीवन संपवलं

Suicide News : एका MBBS डॉक्टरने टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव टी. प्रिंसी उर्फ श्रष्टा (वय 23) असे आहे. आत्महत्या केल्याचं कारण समोर आलं आहे. मांजरीचे पालन करण्यावरून तिचा तिच्या कुटुंबीयांशी वाद झाला, याच वादातून तिने टोकाचं पाऊल उचललं आहे. ही घटना हैदराबाद येथे घडल्याचे वृत्त आहे.  

हे ही वाचा : प्रेमविवाह केल्याने तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणाची नग्न धिंड काढली, जळगावातील भुसावळमध्ये लाज आणणारी घटना

घडलेल्या घटनेनुसार, हैदराबाद येथील सिरला बाजार येथे तरुणीने MBBS चे शिक्षण पूर्ण केले होते. MBBS चे शिक्षण केल्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी ती तयारी करत होती. अशातच तिने मेडिकल लायसेन्ससाठी देखील अर्ज केला होता. 

मांजरीवरून आई आणि लेकीमध्ये वाद, गळफास घेऊन प्रिन्सीनं जीवन संपवलं

पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, प्रिन्सीने घरी एक मांजर घेऊन आली होती. नंतर तिला सर्दी आणि खोकल्याचा मोठा त्रास होऊ लागला, ज्यामुळे आई आणि मुलीमध्ये अनेकदा वाद होऊ लागले होते, दरम्यान असे वृत्त की, शुक्रवारीही त्याच मुद्द्यावरून त्या दोघींमध्ये वाद झाला होता. नंतर प्रिन्सीची आई, कुसुमलता, तिला घरी एकटी सोडून कामावर निघून गेली. सायंकाळी कुसुमलता घरी परतल्या असता, त्यांनी प्रिन्सीला गळफास घेतलेलं पाहिलं. 

हे ही वाचा : नांदेड :विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून भोंदूबाबाचा अत्याचार, बाबा खरातसारखेच आणखी एक प्रकरण

आईच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल

आईने बघताच मुलगी किंचाळू लागली, तिने तात्काळपणे आपल्या शेजाऱ्यांना सावध केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला. पोलिसांनी आईच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचं म्हणणं असं की, कौटुंबिक वादातून हे प्रकरण घडलं. 
 

हे वाचलं का?

    follow whatsapp