जालन्यात रेड्याच्या टकरीवरून दोन गटांत वाद, हाणामारीत तरुणाचा दुर्दैवी अंत, 15 दिवसांपूर्वीच झाला होता विवाह

मुंबई तक

• 03:26 PM • 23 Mar 2026

Jalna Crime : जालन्यात रेड्याच्या टकरीचा नाद एका विवाहित तरुणाच्या जीवावर बेतला आहे. शहरातील मोतीबाग परिसरात सायंकाळी रेड्यांच्या टकरीवरून दोन गटांत मोठा वाद झाला. याच वादाचे रुपांतर हे शिवीगाळ आणि नंतर मारहाणीत झाले. या हल्ल्यात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Jalna Crime

Jalna Crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

जालन्यात रेड्यांच्या टकरीवरून दोन गटात वाद

point

तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण

Jalna Crime : जालन्यात रेड्याच्या टकरीचा नाद एका विवाहित तरुणाच्या जीवावर बेतला आहे. शहरातील मोतीबाग परिसरात सायंकाळी रेड्यांच्या टकरीवरून दोन गटांत मोठा वाद झाला. याच वादाचे रुपांतर हे शिवीगाळ आणि नंतर मारहाणीत झाले, या मारहाणीत रवींद्र अशोक लाड (वय 28 वर्ष) तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या तरुणाचा विवाह होऊन केवळ 15 दिवस झाले होते. संसार सुरु होण्याआधीच त्याचा रेड्यांच्या टकरीवरून दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच तिघे गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : कोल्हापूरमधील वाडी जोतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांना जबर मारहाण, गुलालासह नारळ फेकून मारल्याचे कृत्य

जालन्यात रेड्यांच्या टकरीवरून दोन गटात वाद

जालन्यात रेड्यांच्या टकरीवरून दोन गटात मोठा वाद होऊन एकावर धारदार शास्त्राने हत्या केली. या घटनेत तिघेजण गंभीर जखमी आहेत. शहरातील मोतीबाग परिसरात रविवारी सुरु असलेल्या रेड्यांच्या टकरीवरून वाद झाला, त्या ठिकाणी दोन गटात मोठा वाद निर्माण झाल्याचे वृत्त आहे. या मारहाणीत प्रेम लाड (वय 20 वर्ष), आणि नरेश अवघड (वय 20 वर्ष) हे जखमी झाले होते. 

तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण अन् मृत्यू

वींद्र लाड, प्रेम लाड आणि नरेश अवघड यांचा सोमनाथ अशोक लाड याच्यासोबत रेड्यांच्या टकरीवरून किरकोळ वाद झाला होता. वाद मिटवण्याच्या बहाण्याने आरोपींनी त्या तिघांना मोतीबाग परिसरात नेले, तिथे आल्यानंतर तिघांवर तलवार आणि चाकूने वार करत त्यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात रवींद्र लाड जखमी झाला, तर प्रेम लाड आणि नरेश अवघड यांच्याही डोक्याला दुखापत झाली. 

हे ही वाचा : "देवेंद्र फडणवीस.., तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशय..", अशोक खरात प्रकरणी राज ठाकरेंची प्रतिक्रिया

या प्रकरणात पोलिसांनी संतोष श्रीचंद लाड, सुरज दादाराव लाड आणि सोमनाथ अशोक लाड या तिघांना ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरु आहे.   रेड्यांच्या टकरेवरून सुरु झालेल्या या वादाने हिंसक वळण घेतलं आहे. घटनेनं जालना शहरात खळबळ उडाली आहे.