मोठी बातमी! विधानभवनाच्या गेटला आग, कारण आलं समोर

Mumbai News : मुंबईतील विधानभवनाच्या गेटला आग लागल्याची घटना घडली आहे. आग अटोक्यात आणण्यासाठी आग्निशामक दलाला यश आलं आहे.

Mumbai News

Mumbai News

मुंबई तक

19 May 2025 (अपडेटेड: 19 May 2025, 06:37 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील विधानभवनाच्या गेटला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली.

point

आग अटोक्यात आणण्यासाठी आग्निशामक दलाला यश आलं आहे.

Mumbai News : मुंबईतील विधानभवनाच्या गेटला आग लागल्याची धक्कादायक घटना 19 मे दिवशी घडली आहे. आगीचे कारण समोर आले असून ही आग शॉर्ट सर्किटीमुळे लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान अग्निशामक दल हे घटनास्थळी दाखल झालं. आग अटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाला यश आलं आहे. 

हेही वाचा : Beed Crime : शिवराज शिवटेला मारहाण, सुरेश धस कडाडत म्हणाले 'त्या मुलांना तर...'

हे वाचलं का?

मुंबईतील विधानभवनाच्या गेटला आग लागल्याची घटना काही वृत्तमाध्यमांनी दिली आहे. शॉर्ट सर्किटीमुळे ही आग लागली असून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान, अग्निशामक दल हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

आग अटोक्यात आणण्यासाठी आग्निशामक दलाला यश आलं आहे. विशेष म्हणजे जेव्हा ही घटना घडली होती तेव्हा आमदार हे विधानभवनातच होते. एका बाजूला समित्यांच्या उद्घटनाचा कार्यक्रम सुरू आहे. तर दुसरीकडे विधानभवनाच्या गेटला आग लागल्याची घटना घडली आहे.

अशातच आता घटनास्थळी धुराचे लोट पसरु लागले आहेत. खबरदारी घेण्याच्या दृष्टीकोनातून संपूर्ण परिसर निर्मनुष्य करण्यात आला. समित्यांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली आहे. अशातच विधानसभेचे राहुल नार्वेकरांनी आगीच्या घटनेला दुजोरा दिला आहे.

हेही वाचा : Beed Crime : शिवराज शिवटेला मारहाण, सुरेश धस कडाडत म्हणाले 'त्या मुलांना तर...'

आगीच्या घटनेला राहुल नार्वेकरांचा दुजोरा

राहुल नार्वेकर म्हणाले की, विधानभवनाच्या गेट समोरील भागात आग लागली. स्कॅनिंग मशिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही धक्कादायक घटना घडली आहे. अशातच आता या आगीवर नियंत्रण आलं असल्याची राहुल नार्वेकरांनी माहिती दिली आहे. अशावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील विधानभवनातच होते. या आगीच्या घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

    follow whatsapp