Mumbai Police : धारावीत बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांकडून अटक, काय समोर आलं?

धारावी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी, 17 जानेवारी रोजी दुपारी, नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाली की, धारावीमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी देणारा एक कॉल आला आहे. त्यानंतर पोलिसांनी याबद्दलचा तपास सुरू केला होता.

Mumbai Tak

मुंबई तक

20 Jan 2025 (अपडेटेड: 20 Jan 2025, 08:29 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील धारावीमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी

point

स्फोटाची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक

point

धारावीमध्ये स्फोटाची धमकी देणारा कोण?

मुंबईतील धारावी परिसरात बॉम्बस्फोट करणार असल्याची धमकी मुंबई पोलिसांना आली होती. या प्रकरणात पोलिसांनी एका व्यक्तिला अटक केली आहे. या व्यक्तिने यापूर्वीही अशाच प्रकारच्या धमक्या दिल्याचं समोर आलं आहे.

हे वाचलं का?

धमकी दिल्याची घटना गेल्या शुक्रवारी, 17 जानेवारी रोजी घडली. दुपारी, धारावी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाली. एका अज्ञात मोबाइल नंबरवरून धारावीच्या राजीव गांधी नगरमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन आला आहे. यानंतर, त्या व्यक्तीचा शोध सुरू करण्यात आला. ही व्यक्ती धारावी परिसरातच आढळली. या व्यक्तीचं नाव नरेंद्र गणपत कवळे असून,वय 42 वर्ष आहे. तो धारावी बस डेपोसमोरील राजीव गांधी नगरमध्ये राहतो.

हे ही वाचा >>Pankaja Munde : "मी बीडची लेक, मला बीडचं पालकमंत्रिपद मिळालं असतं तर...", पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

नरेंद्र गणपत कवळे यांचे रेकॉर्ड तपासले असता, त्यांनी दिलेल्या धमकीच्या आधारे, आझाद मैदान, ठाणे येथे कलम 501(1), 506(2), 182 भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचं आढळून आलं. यापूर्वीही त्यानं अशाच प्रकारे बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती.

दिल्लीत बॉम्बची अफवा पसरवणाऱ्याला अटक

हे ही वाचा >>Saif Ali Khan : त्याला माहितीच नव्हतं कोण आहे सैफ अली खान? पोलिसांच्या चौकशीत काय समोर आलं?

काही दिवसांपूर्वी, दिल्ली पोलिसांनी एका मुलाला पकडले होते. या मुलाने 400 शाळांमध्ये बॉम्बचे खोटे फोन केले होते. या मुलासोबत आणखी कोणी होतं का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलाचं कुटुंब एका एनजीओच्या संपर्कात होतं. ही तीच एनजीओ आहे जी अफजल गुरुच्या फाशीला विरोध करत होती. त्यामुळे पोलीस या प्रकरणात सखोल तपास करत आहे.

    follow whatsapp