Saif Ali Khan : त्याला माहितीच नव्हतं कोण आहे सैफ अली खान? पोलिसांच्या चौकशीत काय समोर आलं?
आरोपी शहजादची चौकशी करण्यात आली असून, सध्या तो पोलीस कोठडीत आहे. न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सैफ अली खानवरील हल्ल्यातील आरोपी बांगलादेशचा?

आरोपीला हे सुद्धा माहिती नव्हतं की तो कुणाच्या घरात घुसतोय?

पोलीस तपासात नेमकं काय काय समोर आलं?
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याच्या घटनेनंतर मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तरे दिली आहेत. काही विरोधक मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे असे म्हणत आहेत, पण सत्य असं आहे की, आरोपी बांगलादेशातून आला होता. आधी तो कोलकाता आणि नंतर मुंबईत आला. त्याला हेही माहित नव्हतं की ते एका अभिनेत्याचं घर आहे. तो चोरी करण्याच्या उद्देशानं तिथे घुसला असं अजित पवार म्हणाले.
हे ही वाचा >>Saif Ali Khan हल्ला: आता थेट आंतरराष्ट्रीय कटाचा संशय, कोर्टानेच...
अटक केलेल्या आरोपींपैकी एक बांगलादेशी असल्याचे सांगितले जात असताना अजित पवार यांचं हे विधान समोर आलं आहे. मुंबई पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, तोच सैफचा हल्लेखोर असल्याचं सांगितलं जात आहे. तो चोरीच्या उद्देशानं अभिनेत्याच्या घरात घुसला आणि नंतर त्याला चाकूने जखमी केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असल्याचं सांगितलं जात आहे. त्याला मुंबईतील मेट्रो बांधकाम साइटजवळील कामगार छावणीतून अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा >> फडणवीस सरकारवर मोठी नामुष्की, महाजन-तटकरेंना मोठा धक्का.. पालकमंत्री पदाला स्थगिती
16 जानेवारीच्या रात्री सैफ अली खान त्याच्या घरी होता, तेव्हा आरोपी पहाटे 2.30 वाजता त्याच्या घरात घुसला. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा चोरीच्या उद्देशाने घरात घुसला होता. आरोपीबद्दल असं म्हटलं जातंय की, तो पाच-सहा महिन्यांपूर्वी मुंबईत आला होता. त्याने अभिनेत्यावर हल्ला का केला, त्यामागे काही कट होता का की फक्त चोरीचा हेतू होता? याचे उत्तरं मुंबईत पोलीस शोधत आहेत.
आरोपी पोलीस कोठडीत
आरोपी शहजादची चौकशी करण्यात आली असून, सध्या तो पोलीस कोठडीत आहे. न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीदरम्यान त्याने सांगितलं की, तो अभिनेता सैफच्या घरात प्रवेश करत आहे हे त्याला माहित नव्हतं. चौकशीदरम्यान त्याने सांगितलं की, तो फक्त चोरी करण्याच्या उद्देशाने घरात घुसला होता. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने कोणताही गुन्हा केल्याचा यापूर्वीचा रेकॉर्ड नाही.