मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासून पावसाची बॅटींग! काय आहे दिवसभरासाठी हवामान अंदाज?

Mumbai Local Train and Road Updates:आज दिवसभर पावसाची शक्यता असून, त्यामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसंच याचा परिणाम लोकल आणि रस्ते वाहतुकीवरही होऊ शकतो असं चित्र आहे. 

Mumbai Tak

मुंबई तक

26 May 2025 (अपडेटेड: 26 May 2025, 04:55 PM)

follow google news

Mumbai Weather News: मुंबईमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सूरूवात झाली आहे. तसंच सर्व उपनगरांमध्येही आज पाऊस सुरू झाल्याचं दिसतंय. हवामान विभागाने आज मुंबईत दिवसभर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढला आहे. आज मुंबईत संततधार पाऊस पडण्याची शक्यता असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे (30-40 किमी प्रतितास) वाहण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> बारामतीमध्ये पावसाचं थैमान! निरा डावा कालवा फुटला, रहिवाशी भागांमध्ये घुसलं पाणी

आज दिवसभर पावसाची शक्यता असून, त्यामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसंच याचा परिणाम लोकल आणि रस्ते वाहतुकीवरही होऊ शकतो असं चित्र आहे. 

मागच्या आठवड्यापासून मुंबईत मान्सूनपूर्व पावसाने जोर धरला असून, 22 ते 24 मे दरम्यान मुसळधार पावसाने शहराला झोडपलं होतं. त्यावेळी काही ठिकाणी जलमय परिस्थिती निर्माण झाली होती, ज्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. 

हे ही वाचा >> कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस धो धो बरसणार! मुंबईत कसं आहे आजचं हवामान?

महापालिकेने नागरिकांना समुद्रकिनारी जाण्याचे टाळण्याचे आणि विजांच्या कडकडाटादरम्यान सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाने यंदा मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे आता आजपासूनच मुंबईकरांनी पावसाळ्याच्या तयारीसाठी सज्ज राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

    follow whatsapp