Video : तरुणाच्या गळ्यात बांधला पट्टा, कुत्र्यासारखं भुंकायला लावलं; कारण…

Bhopal Viral Video : मध्यप्रदेशची राजधानी भोपालमधून (Bhopal) एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओत एका तरूणाच्या गळ्य़ात पट्टा बांधून त्याला कुत्र्यासारखी वागणूक दिली जात आहे.

muslim youth tied neck of hindu boy with dog harness belt in bhopal video viral

muslim youth tied neck of hindu boy with dog harness belt in bhopal video viral

मुंबई तक

• 02:03 PM • 19 Jun 2023

follow google news

Bhopal Viral Video : मध्यप्रदेशची राजधानी भोपालमधून (Bhopal) एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओत एका तरूणाच्या गळ्य़ात पट्टा बांधून त्याला कुत्र्यासारखी वागणूक दिली जात आहे. तसेच कुत्र्यांसारखं भुंकण्याची जबरदस्ती केली गेली. यासोबत त्याला माफी मांगण्यास सांगितले जात आहे. या व्हिडिओनंतर राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री चांगलेच आक्रमक झाले आहेत. तसेच पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तीन आरोपींना ताब्यात घेतेल आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. (muslim youth tied neck of hindu boy with dog harness belt in bhopal video viral)

हे वाचलं का?

व्हायरल व्हिडिओत काय?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत, एका तरूणाच्या गळ्यात पट्टा बांधला गेला आहे. आणि हा तरूण जमीनीवर बसला आहे. काही तरूण मिळून या तरूणाला कुत्र्यासाऱखी वागणूक देत शिविगाळ करत आहत. काही तरूणांनी त्याला कु्त्र्यासाऱखं भुंकायला देखील लावलं होते. तसेच त्याला माफी देखील मागायला लावली होती. नेमकं तरूणासोबत असे का केले जातेय, या मागचे कारण समोर आले नाही आहे. मात्र हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हे ही वाचा : सरस्वती वैद्यच्या हत्येचं गूढ उकललं, ‘या’ पदार्थात कीटकनाशक मिसळून हत्या

मी तो व्हिडिओ पाहिला खूप गंभीर आहे. एखाद्या माणसासोबत असा व्यवहार करणे हे निंदनीय आहे, असे या घटनेवर गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले आहेत. गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकारावर, भोपालचे पोलीस कमिश्नर आणि कलेक्टर यांना आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर आता आरोपीविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (NSA) कारवाई करण्यात येत आहे. इतकंच नाही तर तीनही आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवण्यात येणार आहे.

कुटुंबियांचा आरोप काय?

पिडीत तरूणाचे नाव विजय आहे. या घटनेप्रकरणी पिडीत तरूणाच्या कुटुबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार 9 मेला हा व्हिडिओ बनवला गेला होता. पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली होती.पण पोलिसांनी तक्राल दाखल करून घेण्यास नकार देत, कुटुंबियांना पळवून लावले होते, असा आरोप तरूणाच्या भावाने केला होता. यानंतर कुटुंबियांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला होता.

आरोपींनी विजयला नशेची लत लावली.विजयला जबरदस्ती गांजा आणि चरसचा नशा करायला भाग पाडायचे. एकदा तर विजयने आरोपींच्याच सांगण्यावरून घरात चोरी देखील केली होती. याचसोबत तरूणावर जबरदस्ती मास खायला लावून धर्म परीवर्तनसाठी दबाव टाकल्याचा आरोपही कुटुंबियांनी केला आहे.

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात आता तक्रार दाखल करून तीन आरोपींना अटक केली आहे. समीर, साजिद आणि फैजान अशी अटक झालेल्या तरूणींचे नाव आहेत. तसेच विजयवर कोणताच धर्मपरीवर्तनाचा दबाव टाकला नाही, माझ्या मुलाला फसवले जातेय, असे आरोपीचे म्हणणे आहे.

    follow whatsapp