नागपूर हादरलं! टीम इंडिया-न्यूझीलंड सामना पाहून पोलीस झोपले, 19 वर्षीय आरोपीनं कस्टडीत गळफास घेत संपवलं जीवन

Nagpur Suicide : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आरोपी तरुणाने तुरुंगातच गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. आत्महत्येचं ठोस कारण अद्याप समोर आलं नाही, पण जीवनाला कंटाळूनच टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

Nagpur Suicide

Nagpur Suicide

योगेश पांडे

22 Jan 2026 (अपडेटेड: 22 Jan 2026, 02:57 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस

point

कस्टडीत चादरीच्या सहाय्याने गळफास घेत संपवलं जीवन

Nagpur Suicide : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलीस भारत-न्यूझीलंड सामना पाहून झोपले आणि नंतर आरोपी तरुणाने कस्टडीत गळफास घेत आपलं जीवन संपवलं. आत्महत्येचं ठोस कारण अद्याप समोर आलं नाही, पण जीवनाला कंटाळूनच टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. ही घटना 21 जानेवारी घडली असून या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुंबईचं महापौर पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव, भाजपच्या गोटातून 'या' नगरसेविकेचं नाव सर्वात आघाडीवर

नेमकं काय घडलं? 

हे प्रकरण नागपूर येथील जरीपटका ठाण्यातील आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव समोर आले आहे. राजेंद्र भाटिया (वय 19) याने तुरुंगातच आत्महत्या करत जीवन संपवलं. राजेंद्रने एका 16 वर्षाच्या मुलीला घेऊन पळून जाण्याच्या प्रकरणातून उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली होती. 

भारत-न्यूझीलंड सामना पाहून पोलीस झोपले, नंतर आरोपीने गळफास घेत संपवलं जीवन

दरम्यान, राजेंद्रने कस्टडीत चादरीच्या सहाय्याने गळफास घेत आपलं जीवन संपवलं. असे सांगितले जात आहे की, पोलिस ठाण्यात गार्ड ड्युटीवर असलेले राहुल चौहान आणि प्रमोद दुधकवरे यांनी भारत-न्यूझीलंड सामना पाहिला आणि नंतर ते झोपले, त्यानंतर राजेंद्रने आपलं जीवन संपवलं.

हे ही वाचा : गजकेसरी राजयोगाचा 'या' राशीतील लोकांवर परिणाम होईल, करिअर, प्रेमासह पडणार पैशांचा पाऊस

पोलीस ठाण्यात झालेल्या आत्महत्येमुळे, दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले आणि गुन्हा शाखा आणि सीआयडी देखील संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 

    follow whatsapp