माझ्यासोबत संबंध ठेवले नाहीत तर तुझा पती मरेन, नाशकात भोंदूबाबाचे महिलेवर ब्लॅकमेक करत अत्याचार

nashik crime : पुरोगामी महाराष्ट्रात सध्या अंद्धश्रद्धेच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. अशीच एक धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशकात भोंदूगिरी आणि अंद्धश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या बाबाचा एक कारनामा चव्हाट्यावर आला आहे.

Nashik Crime

Nashik Crime

मुंबई तक

• 02:51 PM • 17 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

नाशिकमध्ये भोंदूबाबचं कांड

point

भोंदूबाबाचा महिलेवर दबाव आणत नको तेच केलं

point

एकूण प्रकरण काय?

Nashik Crime : पुरोगामी महाराष्ट्रात सध्या अंद्धश्रद्धेच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. अशीच एक धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशकात भोंदूगिरी आणि अंद्धश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या बाबाचा एक कारनामा चव्हाट्यावर आला आहे. भोंदूबाबाने विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील भोंदूबाबा म्हणून गणेश जगपात असं भोंदूगिरी करणाऱ्या बाबांचं नाव समोर आलं आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 

नाशिकमध्ये भोंदूबाबचं कांड

मिळालेल्या माहितीनुसार, जादूटोण्याची भीती दाखवत भोंदूबाबा 14 वर्षांपासून महिलेवर लैंगिक अत्याचार करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. भोंदूबाबाने एक दोन नव्हे तर एका कुटुंबाची तब्बल 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

'तु मला खूप आवडते, तुला मिळवण्यासाठी मी...' भोंदूबाबाचा महिलेवर दबाव

तु मला खूप आवडते, तुला मिळवण्यासाठी मी स्मशानात पूजा करतो, असं म्हणत महिलेवर अनेकदा दबाव आणला. तो एवढ्यावरच न थांबता तो पुढे म्हणाला की, जर तिने माझ्यासोबत संबंध ठेवले नाहीत तर एका पुस्तकात लिहिलेल्या पतीसह मुलांचाही नावे लिहिली त्यापैकी एकाचा बळी जाईल अशी भोंदूबाबाने पीडितेला दिली होती. 

हे ही वाचा : आर्मी भरतीचं स्वप्न अधुरं, परीक्षेहून येताना 2 जीवलग मित्रांना ऊसाच्या ट्रकने चिरडलं, कोल्हापुरात हळहळ

दरम्यान, पीडितेनं दिलेल्या तक्रारीत म्हटलं की, भोंदूबाबाविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. इंदिरानगर पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु केला आहे. अशातच संबंधित भोंदूबाब हा सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे. 

    follow whatsapp