Mumbai Railway Safety: भारत-पाक युद्धाच्या तणावामुळे देशात सर्वत्र सुरक्षा यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांकडून सुद्धा बऱ्याच यंत्रणा राबवण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणांवर, जसे की रेल्वे, मेट्रो सेवा, शाळा, महाविद्यालये, मॉल्स कसून तपासणी केली जात आहे. मात्र, मुंबईतील काही प्रमुख स्थानकांवर बॉडी स्कॅनर आणि बॅगेज स्कॅनर बंद असल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
मुंबई स्थानकांवर सुरक्षा यंत्रणा
खरंतर, घड्याळ्याच्या काट्यावर धावणारं शहर म्हणून देशभरात मुंबई शहराची ख्याती आहे. इथे दररोज लाखो लोक प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. या शहरातील मोठ्या नोकरदार वर्गासाठी रेल्वेचा प्रवास सोयीस्कर वाटतो. भारत-पाक संघर्षामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रेल्वे स्थानकावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्या आल्या आहेत. तसेच, या शहरातील मुख्य रेल्वे स्थानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर लाखो लोकांची वर्दळ पाहायला मिळते. मात्र, सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने या स्थानकावर बसवलेले बॉडी आणि बॅग स्कॅनर बंद असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्य रेल्वे स्टेशनवरील बॉडी-बॅगेज स्कॅनर बंद
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकावर बसवण्यात आलेले बॉडी आणि बॅग स्कॅवर बंद असल्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्या, हे स्कॅवर बंद पडल्यामुळे तिथल्या नवीन मशीन्सची ऑर्डर देण्यात आली आहे. दरम्यान, कंत्राटदार बदलल्याने या सगळ्याला वेळ लागणार असून आता सुरक्षेततेची जबाबदारी आरपीएफ आणि पोलिसांवर असणार आहे.
हे ही वाचा: Mumbai Goa Highway Accident: अंत्यसंस्काराला जाणाऱ्या 5 जणांचा जागीच मृत्यू, जगबुडी नदीत कार कोसळली अन्
सीएसएमटी स्थानकातून बऱ्याच मेल आणि एक्सप्रेस सुटतात. यामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसोबत बरेच सामान आणि बॅग्ज असतात. अशा परिस्थितीत, आरपीएफ आणि पोलीस 24 तास त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकत नसल्याने बॉडी आणि बॅग स्कॅनरद्वारे तपासणी वाढवण्याची प्रवाशांची मागणी आहे.
हे ही वाचा: ज्योती मल्होत्राची मैत्रीण पण करायची PAK साठी काम..? कोण आहे Youtuber प्रियंका सेनापती?
पश्चिम रेल्वेच्या 'या' स्थानकांवर अशीच परिस्थिती
यासोबतच, पश्चिम रेल्वेच्या मुख्य टर्मिनसपैकी मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनसवर सुद्धा अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. या रेल्वे स्टेशनवरील गेटवर बसवण्यात आलेले बॉडी स्कॅनर आणि बॅगेज स्कॅनर बंद असल्याचं देखील समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
