Railway Recruitment: रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारतीय रेल्वेकडून लवकरच एक लाखांहून अधिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात येणार आहे. साल 2025-26 आणि 2026-27 मध्ये जवळपास 50-50 उमेदवारांना सरकारी नोकऱ्या देण्यात येणार असल्याची रेल्वे मंत्रालयाने पुष्टी केली आहे.
ADVERTISEMENT
रेल्वे भरती बोर्डाकडून (RRB) गेल्या काही महिन्यांत भरतीची प्रक्रिया वेगानं होत असल्याचं पाहायला मिळतंय. मंत्रालयाच्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2024 पासून आतापर्यंत 7 वेगवेगळ्या भरती नोटिफिकेशन अंतर्गत 55,197 रिक्त पदांसाठी संगणक आधारित परीक्षा (CBT) आयोजित केल्या गेल्या आहेत. देशभरातून सुमारे 1.86 कोटी उमेदवारांनी या परीक्षांमध्ये भाग घेतला. ही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, 2025-26 मध्ये 50,000 हून अधिक पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाईल.
हे ही वाचा: दारू पितो म्हणून सख्खा भाऊ झाला पक्का वैरी, आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेत तरुणीवर लैंगिक अत्याचार
2024 मध्ये 1.08 लाख पदांची घोषणा
रेल्वेने 2024 मध्ये एकूण 1,08,324 पदांसाठी भरती जाहीर केली होती. यापैकी निम्मी पदे 2025-26 मध्ये भरली जातील आणि उर्वरित 50,000 हून अधिक पदे 2026-27 मध्ये भरली जातील. रेल्वे मंत्रालयाने आपल्या प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की या योजनेअंतर्गत 12 नोटिफिकेशन्स आधीच जाहीर करण्यात आल्या असून ही प्रक्रिया भविष्यातही सुरू राहील.
हे ही वाचा: कारमध्ये मुख्याध्यापक पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहिलं अन्... वकील पत्नीने नेमकं काय केलं? व्हिडीओ व्हायरल!
9000 हून अधिक उमेदवारांना मिळाली नोकरी
आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 9000 हून अधिक उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली असल्याचं रेल्वे विभागाने सांगितलं. यावरून रेल्वे सध्या सर्व रिक्त पदे भरण्याच्या दिशेने काम करत असल्याचं दिसून येत आहे.
रेल्वे भरती बोर्डाची परीक्षा ही देशातील सर्वात मोठ्या स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक मानली जाते. या परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांची संख्या लाखोंमध्ये असते आणि परीक्षा आयोजित करताना अचूक नियोजन आवश्यक असतं. म्हणूनच मंत्रालय प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता आणि कार्यक्षमतेने काम करत आहे.
ADVERTISEMENT
