AAI Recruitment: एअरपोर्टसारख्या प्रतिष्ठित ठिकणी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) म्हणजेच भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून एकूण 197 अप्रेन्टिसशिप पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. आयटीआय (ITI), डिप्लोमा (Diploma) आणि ग्रॅज्युएट असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरू शकतात. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार 14 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. टेक्निकल किंवा अभियांत्रिकीमध्ये शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी या भरतीच्या माध्यमातून नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे.
ADVERTISEMENT
किती असेल ट्रेनिंगचा कालावधी?
या भरतीच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांना 12 महिने म्हणजेच 1 वर्षाचं ट्रेनिंग दिलं जाईल. ट्रेनिंग दरम्यान निवड झालेल्या उमेदवारांना काम शिकण्याची संधी मिळेल आणि यासोबतच दर महिन्याला स्टायपेंड देखील दिलं जाईल.
काय आहे पात्रता?
ग्रॅज्युएट अप्रेन्टिस: संबंधित क्षेत्रात चार वर्षांची फुल टाइम डिग्री असणं आवश्यक
डिप्लोमा अप्रेन्टिस: इंजीनियरिंग म्हणजेच अभियांत्रिकीमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा आवश्यक
आयटीआय अप्रेन्टिस: संबंधित ट्रेडमध्ये ITI किंवा NCVT प्रमाणपत्र आवश्यक
हे ही वाचा: मुंबईची खबर: MHADA Lottery 2025: म्हाडाच्या 5285 घरांसाठी लॉटरी, पाहा कसा भरायचा फॉर्म, 'ही' आहे शेवटची तारीख
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 26 वर्षे असणं अनिवार्य आहे. तसेच सरकारी नियमांनुसार राखीव (SC, ST, OBC, PwBD) प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.
किती मिळेल स्टायपेंड?
आयटीआय अप्रेन्टिस: दरमहा 9,000 रुपये
डिप्लोमा अप्रेन्टिस: दरमहा 12,000 रुपये
ग्रॅज्युएट अप्रेन्टिस: दरमहा 15,000 रुपये
हे ही वाचा: धावत्या ट्रेनमधून महिलेला मारला धक्का, जागीच मृत्यू... अनोळखी माणसाच्या कृत्याने ठाणे हादरलं!
कसा कराल अर्ज?
1. सर्वप्रथम nats.education.gov.in या AAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
2. होमपेजवरील संबंधित भरतीच्या लिंकवर क्लिक करा.
3. त्यानंतर आपली आवश्यक माहिती भरा.
4. रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉगिन आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा.
5. आवश्यक डॉक्यूमेंट्स अपलोड करा आणि अर्जाचं शुल्क मागितल्यास ते भरा.
6. त्यानंतर फॉर्म डाउनलोड करून ते सेव्ह करून घ्या.
ADVERTISEMENT
