धावत्या ट्रेनमधून महिलेला मारला धक्का, जागीच मृत्यू... अनोळखी माणसाच्या कृत्याने ठाणे हादरलं!
ठाणे जिल्ह्यातील दिवा शहरातून रेल्वे स्टेशनवर झालेल्या वादामुळे एका 39 वर्षीय व्यक्तीने महिलेला चालत्या मालगाडीच्या समोर ढकललं आणि त्यात महिलेचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

रेल्वे स्टेशनवरील वाद टोकाला पोहचला

महिलेला धावत्या मालगाडी समोर ढकललं अन्...

ठाण्यातील दिवा रेल्वे स्टेशनवर घडली धक्कादायक घटना
Thane Crime: ठाणे जिल्ह्यातील दिवा शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रेल्वे स्टेशनवर झालेल्या वादामुळे एका 39 वर्षीय व्यक्तीने महिलेला चालत्या मालगाडीच्या समोर ढकललं आणि त्यात महिलेचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. या घटनेत मृत पावलेल्या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून या घटनेमागचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रकरणातील आरोपी व्यक्तीचं नाव राजन सिंग असून तो दिवा शहरात राहत असल्याची माहिती मिळाली आहे.
रेल्वे स्टेशनवर दोघांमध्ये झाला वाद...
जीआरपी नुसार, रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म 5 वर महिला आणि आरोपीमध्ये मोठा वाद झाला. पुढे त्यांच्यातील वाद टोकाला पोहचला आणि आरोपीने महिलेला वेगाने येत असलेल्या मालगाडीच्या समोर ढकललं. त्यावेळी महिलेल्या गंभीर दुखापत होऊन तिच्या जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना घडल्यानंतर आरोपी सिंग घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्यावेळी एका जीआरपी कॉन्स्टेबलने त्याला ताब्यात घेतलं.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबईत मिळवा हक्काचं घर! MHADA ची 5 हजारहून अधिक घरांसाठी मोठी लॉटरी... कधी आणि कसा कराल अर्ज?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिला एकमेकांना ओळखत नव्हते. पोलिसांच्या मते, त्यावेळी आरोपी सिंगने महिलेसोबत गैरवर्तन केलं असल्याचं सांगितलं जात आहे. आरोपी सिंग ड्रायव्हर म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाली आहे.
हे ही वाचा: Personal Finance: रोज करा 121 रुपयांची बचत अन् मिळवा 27 लाख रुपये, हा LIC प्लॅन खूपच सॉलिड!
महिलेची ओळख पटण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न
ठाणे जीआरपीच्या वरिष्ठ निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस सध्या पीडित महिलेची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि दोघांमधील वादाचं कारण शोधण्याच्या दृष्टीने काम करत आहेत. या प्रकरणातील आरोपी राजन सिंगवर भारतीय दंड संहितेच्या कलम 103 (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने आरोपीला 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.