BSF Recruitment: देश सेवेसाठी आपलं योगदान देऊ इच्छिणाऱ्या सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सीमा सुरक्षा दल (BSF) कडून कॉन्स्टेबल आणि ट्रेड्समनच्या पदासाठी भरतीची नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. या भरतीसाठी इच्छुक असलेले उमेदवार bsf.gov.in या बीएसएफच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया 26 जुलै रोजी सुरू होणार असून उमेदवार 25 ऑगस्ट पर्यंत अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT
या भरतीअंतर्गत एकूण 3,588 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामधील 3,406 जागा पुरुषांसाठी आणि 182 जागा महिलांसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये शिंपी, प्लंबर, सुतार, रंगकाम करणारे, इलेक्ट्रिशियन आणि इतर ट्रेड्समध्ये नियुक्त्या केल्या जातील.
वयोमर्यादा
अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवाराचं वय 18 ते 25 वर्षे असणं आवश्यक आहे. तसेच, राखीव (SC, ST आणि OBC) प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.
हे ही वाचा: मुंबईची खबर: तीन बायका अन् फजिती ऐका! भामट्याने रेल्वेत काम करणाऱ्या महिलेलाही फसवलं, मेट्रोमोनी साईटवर..
शैक्षणिक पात्रता
टेक्निकल पदांसाठी (जसे की प्लंबर, सुतार, रंगकाम करणारा इ.) अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून दहावी (मॅट्रिक) किंवा समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, संबंधित ट्रेडमध्ये दोन वर्षांचं आयटीआय (ITI) सर्टिफिकेट किंवा 1 वर्षाचं आयटीआय (ITI) सर्टिफिकेट तसेच मान्यताप्राप्त संस्थेतून व्यावसायिक प्रशिक्षण आणि एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
नॉन-टेक्निकल ट्रेडसाठी (जसे की धोबी, न्हावी, शिंपी इ.) पदांसाठी अर्ज करण्यासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. भरतीमध्ये निवडीसाठी ट्रेड टेस्ट उत्तीर्ण होणे अनिवार्य असेल.
हे ही वाचा: विधवा वहिनीला दीर म्हणाला, भावाच्या जागी मी... दोघांमध्ये अचानक झाली गर्लफ्रेंडची एन्ट्री अन् घडलं कांड!
डिटेल्ड नोटिफिकेशन
भरतीच्या सविस्तर नोटिफिकेशनमध्ये अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची यादी आणि अर्ज शुल्क यासारखी महत्त्वाची माहिती दिली जाईल. उमेदवारांना सर्व सूचना लक्षपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
