कल्याण: कल्याण पूर्वमधील एका क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट तरूणीला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ माजली. याप्रकरणी राजकीय प्रतिक्रिया देखील समोर आल्या. ज्यानंतर आरोपी गोकूळ झा आणि त्याचा भाऊ मोठा भाऊ रंजीत झा यांना पोलिसांनी अटक केली. पण आता या प्रकरणातील एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाला नवं वळण लागलं आहे.
ADVERTISEMENT
रिसेप्शनिस्ट तरूणीने गोकूळ झा हिच्या वहिनीला मारलेली कानशिलात, तो VIDEO आला समोर..
सुरूवातीला गोकूळ झा आणि त्याचा मोठा भाऊ हे थेट डॉक्टरच्या केबिनमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी रिसेप्शनवर असलेल्या तरुणीने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गोकूळ झा याने तरूणीला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली आणि तिच्या अंगावर धावून गेला. तसंच त्याने रिसेप्शन टेबलवर देखील लाथ मारली.
यावेळी गोकूळ झा याच्या आईने त्याला ढकलत बाहेर नेलं. पण पुन्हा एकदा गोकूळ झा याने क्लिनिकच्या बाहेरून शिव्या देण्यास सुरूवात केली. त्यावेळी रिसेप्शनिस्ट देखील संतापली आणि तिनेही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा>> प्रेयसीसोबत सतत शारीरिक संबंध, गरोदर राहिली पण... पुण्यातील महिलेवर लैंगिक अत्याचार
हा सगळा प्रकार घडला तेव्हा तिथेच गोकूळ झा याची वहिनी देखील उभी होती. जेव्हा गोकूळ झा हा जोरजोरात शिवीगाळ करत होता त्यावेळी संतापलेल्या तरूणीने आपल्या टेबलवर असलेली कागदपत्रं प्रचंड रागाने फेकून दिली आणि ती पुढे आली. ज्यानंतर तिने थेट गोकूळ झा हिच्या वहिनीच्या जवळ जाऊन थेट कानशिलात लगावली.
हे दृश्य पाहिल्यानंतर आरोपी गोकूळ झा हा अधिक त्वेषाने क्लिनिकमध्ये घुसला आणि त्याने थेट तरूणीच्या छातीत लाथ मारली.. त्यानंतर तिच्या केसाला धरून त्याने तिला जीवघेण्या पद्धतीने मारहाण केल्याचं या नव्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
दरम्यान, आरोपी गोकुळ झा आणि रंजीत झा यांच्या पालकांनी मानपाडा पोलीस ठाण्यात आज (23 जुलै) हजेरी लावली. त्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला असून, अशी घटना घडणं चुकीचं असल्याचंही स्पष्ट केलं.
पण याचवेळी आरोपी गोकुळच्या आईने असाही दावा केला की, "जो चुकीचं वागलाय त्याला शिक्षा झालीच पाहिजे, पण माझा मोठा मुलगा रंजीत या प्रकरणात गुन्हेगार नाही. घटना माझ्या डोळ्यांसमोर घडली. त्या मुलीने आधी माझ्या सुनेच्या कानाखाली मारली. त्यानंतर गोकूळने तिला माराहणा केली. त्यामुळे दोन्ही बाजू ऐकल्या पाहिजेत.”
हे ही वाचा>> विधवा वहिनीला दीर म्हणाला, भावाच्या जागी मी... दोघांमध्ये अचानक झाली गर्लफ्रेंडची एन्ट्री अन् घडलं कांड!
'तसंच सीसीटीव्ही फुटेज मुद्दाम कट करून दाखवलं जातंय. आधी माझ्या सुनेला मारहाण झाली, त्यामुळे गोकुळने त्या मुलीला मारलं, पण मी हे मान्य करते की, त्याने केलेली कृती योग्य नव्हती. पण मुलीने देखील माझ्या सुनेच्या कानाखाली मारलेली हे सीसीटीव्हीमध्ये दाखवलं गेलं पाहिजे.” असं मत गोकूळ झाच्या आईने व्यक्त केलं आहे.
'त्यांनी पहिले मला मारहाण केली', नव्या VIDEO नंतर तरूणीचा दावा
'साडे सहाच्या दरम्यान, जो झा पेशंट होता तो आतमध्ये जाण्यासाठी घाई करत होता. माझं एवढंच कर्तव्य होतं.. सरांनी मला सांगितलं होतं की, पेशंट थांबवा म्हणून.. तर मी त्या पेशंटला रिक्वेस्ट पण केली की, सरांनी पेशंट थांबवायला सांगितले आहेत.'
'त्याची एवढी हिमंत की, त्याने मला शिवीगाळ केली. हे चुकीचं आहे ना त्याचं शिवीगाळ करणं. माझं काम होतं त्यांना थांबवणं. कारण मला सरांनी स्वत: सांगितलेलं की थांबवा म्हणून.. त्याने मला एवढ्या घाण शिव्या दिल्या की, मी सांगू सुद्धा शकत नाही. त्याचे जे नातेवाईक होते त्यांना सांगणं माझं कामच होतं की, हा मला शिव्या देतोय. त्यावरून त्याला माझा राग आला तर त्याने मला मारहाण केली. त्यांनी पहिले मला मारहाण केली आणि शिवीगाळ केली.' अशी माहिती पीडित तरूणीने दिली आहे.
ADVERTISEMENT
