Govt Job: Indian Navy मध्ये नोकरीची सुवर्णसंधी... प्रचंड आकर्षक पगार

भारतीय नौदलाकडून शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) कार्यकारी म्हणजेच एक्झिक्यूटिव्ह शाखेतील अनेक पदांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आली आहे.

इंडियन Navy मध्ये नोकरीची सुवर्णसंधी... किती मिळेल पगार?

इंडियन Navy मध्ये नोकरीची सुवर्णसंधी... किती मिळेल पगार?

मुंबई तक

03 Aug 2025 (अपडेटेड: 04 Aug 2025, 06:24 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

इंडियन Navy मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

point

'या' पदांसाठी निघाली भरती

point

कधीपर्यंत कराल अर्ज?

Govt Job: सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असलेल्या उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरतीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. इंडियन Navy कडून शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) कार्यकारी म्हणजेच एक्झिक्यूटिव्ह शाखेतील अनेक पदांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आली आहे. ही भरती 2025 वर्षातील रिक्त पदांसाठी निघाली असून आणि अर्ज प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. 

हे वाचलं का?

काय आहे पात्रता? 

ज्या उमेदवारांनी भारताच्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून BE/ B.Tech ची डिग्री प्राप्त केली असेल, असे उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. याव्यतिरिक्त, काही पदांसाठी MCA, M.Sc किंवा MBA सारखी डिग्री प्राप्त केलेले उमेदवार सुद्धा या भरतीसाठी पात्र ठरू शकतात. तसेच, या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचा जन्म 2 जुलै 2000 ते 1 जानेवारी 2005 दरम्यान असावा.

'या' पदांसाठी निघाली भरती

या भरतीअंतर्गत एकूण 15 पदांवर नियुक्त्या केल्या जातील. ही पदे एसएससी एक्झिक्युटिव्ह (माहिती तंत्रज्ञान) कॅडर अंतर्गत येतात. निवडलेल्या उमेदवारांना भारतीय नौदलाच्या विविध युनिट्स आणि ट्रेनिंग सेंटर्समध्ये नियुक्त केलं जाईल.

हे ही वाचा: "शिवछत्रपतींच्या रायगडमध्ये डान्सबार?' राज ठाकरेंचा प्रश्न आणि मनसैनिक पनवेलच्या रस्त्यावर, 'नाईट रायडर्स' डान्स बारची तोडफोड

किती मिळेल पगार? 

भारतीय नौदलात निवड झालेल्या एसएससी कार्यकारी अधिकाऱ्यांना  सुरुवातीला दरमहा सुमारे 56,100 रुपये पगार दिला जातो. याव्यतिरिक्त, निवड झालेल्या उमेदवारांना महागाई भत्ता, प्रवास भत्ता, गणवेश भत्ता आणि इतर सुविधा देखील मिळतात. तसेच, पदावर कार्यरत असलेल्या उमेदवारांचं कालांतराने वेतन वाढत जातं. यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा, कुटुंबासाठी राहण्याची व्यवस्था आणि कॅन्टीन सुविधा अशा अनेक सुविधा मिळतात.

निवड प्रक्रिया 

उमेदवारांची निवड मेरिट लिस्ट, शैक्षणिक पात्रता आणि एसएसबी मुलाखतीच्या आधारे केली जाईल. या भरतीसाठी लेखी परीक्षा होणार नसून पात्र उमेदवारांना थेट एसएसबी मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखत उत्तीर्ण झाल्यानंतर, वैद्यकीय चाचणी आणि डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया असेल.

हे ही वाचा: पत्नीला पाहिलं दुसऱ्याच पुरुषासोबत अन् संतापलेल्या पत्नीने थेट चाकूने, मग पोलिसांना भलतंच सांगितलं...

कसा कराल अर्ज? 

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार www.joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2025 निश्चित करण्यात आली आहे. अर्ज करताना मार्कशीट, पदवी प्रमाणपत्र, पासपोर्ट साइझ फोटो इ. सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. 

    follow whatsapp