भलत्याच पुरूषासोबत सुरू होती पत्नीची कामक्रीडा, पतीने रंगेहाथ पकडून जाब विचारला तर पत्नीने कांडच करून टाकला!
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यात एका सायरा नावाच्या महिलेने तिच्या पतीवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. आरोपी पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्याचा पीडित पतीने दावा केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पत्नीला आक्षेपार्ह स्थितीत दुसऱ्या पुरुषासोबत..
संतापलेल्या पत्नीने थेट चाकूने केला वार
Crime News: उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका सायरा नावाच्या महिलेने तिच्या पतीवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. आरोपी पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्याचा पीडित पतीने दावा केला आहे. त्यावेळी पतीने विरोध केला असता सायराने त्याच्यावर चाकून हल्ला केला. सध्या पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पत्नी दुसऱ्या पुरुषासोबत आक्षेपार्ह अवस्थेत...
ही घटना मुजफ्फरनगर मधील थालापार पोलीस स्टेशन परिसरात घडल्याची माहिती आहे. तसेच, पीडित व्यक्ती जहांगीर पट्टीतील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. शनिवारी (2 जुलै) संध्याकाळी रक्ताने माखलेल्या अवस्थेत आसिफ नावाच्या एका व्यक्तीला रुग्णालयात आणण्यात आलं. उपचारादरम्यान, जखमी आसिफने आपल्या पत्नीवर आरोप करताना सांगितले की, बाजारातून सामान घेऊन घरी परतल्यानंतर त्याने आपली पत्नी सायराला दुसऱ्याच पुरुषासोबत अंथरुणावर पाहिलं.
हे ही वाचा: विवाहित पुरुषाचे लिव्ह इन पार्टनरसोबत संबंध, पण पत्नी आजारी अन् पार्टनरला खटकली 'ती' गोष्ट मग थेट...
पत्नीने केला चाकून हल्ला
पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यानंतर आसिफने विरोध करत या सगळ्याचा जाब विचारला. तेव्हा सायराचा प्रियकर संधी मिळताच तेथून पळून गेला. यादरम्यान त्याची पत्नी सायरा हिने रागाच्या भरात आसिफवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर पद्धतीने जखमी झाला.
पोलिसांना दिली माहिती
अशातच, घरातील आवाज ऐकून शेजाऱ्यांनी प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आणि आसिफला सायराच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर आसिफला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.










