"शिवछत्रपतींच्या रायगडमध्ये डान्सबार?' राज ठाकरेंचा प्रश्न आणि मनसैनिक पनवेलच्या रस्त्यावर, 'नाईट रायडर्स' डान्स बारची तोडफोड
राज ठाकरे यांनी पनवेलमधील अवैधरित्या सुरु असलेल्या डान्सबार विरोधात प्रश्न केला. त्यांच्या वक्तव्यानंतर मनसैनिकांनी पनवेलमधील नाईड रायडर्स हा डान्स बार फोडला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शेकापच्या वर्धापनदिनी विरोधकांवर राज ठाकरेंची टीका
भाषेवरही केलं भाष्य
अखेर मनसैनिक रस्त्यावर
Panvel Dance bar action : छत्रपती शिवरायांची राजधानी म्हणून रायगडची ओळख आहे. याच रायगडात परप्रांतीय येऊन बार चालवत आहेत. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खणा-नारळाने ओटी भरणाऱ्या शिवछत्रपतींची राजधानी असणाऱ्या रायगडमध्ये डान्स बार सुरूयेत? असा प्रश्न राज ठाकरे यांनी शेकापच्या वर्धापनदिनी उपस्थित केला होता. यानंतर, मनसे कार्यकर्त्यांनी 2 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास डान्स बार फोडत कारवाई केली आहे. संबंधित प्रकरणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
हे ही वाचा : Astrology 2025 : शनि आणि बुध ग्रहाची वक्री, काही राशीतील लोकांचे स्वप्न होणार पूर्ण, नोकरदारांचा वाढणार पगार, काय सांगतं ज्योतिषशास्त्र?
पनवेलमध्ये मध्यंतरी बार बंद होते, मात्र नंतर अचानकपणे बार सुरू झाले. सध्या राज्यात महायुतीची सत्ता असून दुसरीकडे पनवेलमध्ये भाजपची सत्ता आहे. मग याच सत्तेच्या नेत्वृतात हे बार सुरू तर नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होतो. याच मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी काल शेकापच्या वर्धापनदिनी अनेक मुद्द्यावरून सरकारला घेरलं आहे. यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी पनवेलच्या 'नाईड रायडर्स' नावाचा डान्स बार फोडल्याचं चित्र समोर आलं आहे. संबंधित प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडिओत मनसेचे कार्यकर्ते 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो', 'राजसाहेब ठाकरेंचा विजय असो', अशी घोषणाबाजी करत आहेत.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे यांनी शेकापच्या वर्धापनादिनीनिमित्त अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. आपल्या रायगडमधील जी जमीन आहे ती सर्व जमीन ही शेतकऱ्यांचीच आहे. या जमिनी विकताना केवळ आपल्या मुलांना नोकऱ्याच नाही,तर इथं आम्ही पार्टनर राहू, अशीच अट ठेवा आणि मगच जमीन द्या, असे म्हणत राज ठाकरे यांनी परप्रांतीय उद्योजकांच्या आक्रमणाविरोधात आवाज उठवला आहे. त्यानंतर ते म्हणाले की, आपली भाषा आणि आपली जमीन जोवर आहे तोवर मराठी माणसाचं आस्तित्व आहे, असेही ते म्हणाले.
हे ही वाचा : 'महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा...' राज ठाकरेंची 'ही' बोचरी टीका, CM फडणवीसांना डिवचलं!
यानंतर बोलताना त्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर काम करणारे नोकरदार हे 100 टक्के मराठीच हवेत, असे सांगितलं. त्यानंतर त्यांनी राज्य सरकारलाही धारेवर धरलं. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना राज्यात हिंदीची सक्ती करावीशी वाटते. पण, बाहेरून इथं येऊन उद्योगधंदे करणाऱ्यांना मराठी शिकवण्याची आस्था नाही, असे म्हणत त्यांनी टीकेची तोफ डागली आहे.










