Astrology 2025 : शनि आणि बुध ग्रहाची वक्री, काही राशीतील लोकांचे स्वप्न होणार पूर्ण, नोकरदारांचा वाढणार पगार, काय सांगतं ज्योतिषशास्त्र?
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या राशीतील बदल आणि त्यांच्या हालचालींचा केवळ वैयक्तिकच नाही, तर देश आणि जागतिक पातळीवर परिणाम होणार असल्याचं ज्योतिषशास्त्राने सांगितलं.

1/5
शनि-बुद्ध वक्री 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या राशीतील बदल आणि त्यांच्या हालचालींचा केवळ वैयक्तिकच नाही, तर देश आणि जागतिक पातळीवर परिणाम होणार असल्याचं ज्योतिषशास्त्राने सांगितलं.

2/5
नोव्हेंबर 2025 पर्यंत शनची वक्री राहणार आहे. तर, 11 ऑगस्ट 2025 पर्यंत बुध वक्री राहणार आहे. दरम्यान या दोन्ही ग्रहांची हालचाल काही राशींसाठी शुभ ठरेल, चला जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हा काळ सकारात्मतक आहे.

3/5
मेष राशी
बुध आणि शनि यांच्यातील वक्रीमुळे मेष राशीतील लोकांच्या आयुष्यात साडेसातीच फेरा आहे. पण हा साडेसातीचा फेरा काही दिवस असणार असल्याचं ज्योतिषशास्त्र सांगतं. अनेक वर्षांपासूनच्या समस्या निर्माण होऊ शकतात. शनीच्या हालचालींचे नकारात्मक परिणाम ठरतील. अनावश्यक खर्च करणे टाळावं, असे ज्योतिषशास्त्र सांगतं.

4/5
तूळ राशी
तूळ राशीतील लोकांच्या आयुष्यात हा काळ फार महत्त्वाचा असणार आहे. या काळात नोकरदारांना चांगले प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील कलह संपण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल आणि प्रतिस्पर्धी तुमच्यावर भारी पडणार नाही.

5/5
कुंभ राशी
कुंभ राशीसाठी, शनि आणि बुध यांची वक्री चाल खूप फलदायी ठरू शकते. या राशीच्या दुसऱ्या घरात शनि वक्री आहे आणि सहाव्या घरात बुध वक्री आहे. या काळात केलेल्या प्रयत्नांचे चांगले परिणाम मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत असेल आणि अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता असू शकते. अनावश्यक खर्चापासून तुमची सुटका होईल.