'महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा...' राज ठाकरेंची 'ही' बोचरी टीका, CM फडणवीसांना डिवचलं!

मुंबई तक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगडमध्ये भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुन्हा जोरदार टीका केली आहे. जाणून घ्या नेमकं काय म्हणाले राज ठाकरे

ADVERTISEMENT

chief minister of maharashtra is thinking about how to introduce and teach hindi to children of maharashtra raj thackeray criticized cm devendra fadnavis and ridiculed him
राज ठाकरेंची CM फडणवीसांवर टीका
social share
google news

रायगड: शेतकरी कामगार पक्षाच्या रायगडमधील मेळाव्याला आज (2 ऑगस्ट) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विशेष उपस्थिती लावली होती. यावेळी राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. 

मुंबई Tak बैठक या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते की, काहीही झालं तरी महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करणारच. त्यानंतर राज ठाकरे हे पुन्हा आक्रम झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी हिंदी सक्ती लागू करावी. असं आव्हानंच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं होतं. त्यातच आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना त्यांनी डिवचलं आहे. 'महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा महाराष्ट्रातील लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय.' अशी बोचरी टीका राज ठाकरेंनी केली आहे.

पाहा राज ठाकरे नेमकं काय म्हणाले...

'महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा महाराष्ट्रातील लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय. पण महाराष्ट्रात जे कामधंद्यासाठी येतायेत त्यांना मराठी कशी येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या मनात. महाराष्ट्रातील मराठी माणूस, भूमिपुत्र याचा विचारच नाही.'

हे ही वाचा>> 'दुबे तुम मुंबई आओ.. तुझे समंदर में दुबे, दुबेकर मारेंगे...', भर सभेत राज ठाकरेंचा खासदार दुबेंवर ठाकरी प्रहार!

'आज सगळ्याचं विदारक स्वरूप जर कुठे असेल तर तो रायगड जिल्हा आहे. रायगड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत. कुंपणच शेत खातंय.. उद्योगधंदे येतायेत त्यासाठी बाहेरच्या राज्यातून माणसं येतायेत.' 

हे वाचलं का?

    follow whatsapp