Crime News: हरियाणातील गुरुग्राममध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. शनिवारी (2 जुलै) पहाटे एका 40 वर्षीय भंगारचा व्यापार करणाऱ्या व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं. डीएलएफ फेज-3 परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे. येथे पीडित व्यापारी हरीश शर्मा त्याच्या लिव्ह-इन पार्टनर यशमीत कौरसोबत भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. गेल्या एक वर्षापासून दोघेही एकत्र राहत होते.
ADVERTISEMENT
लिव्ह इन पार्टनरला खटकली 'ती' गोष्ट
प्रकरणातील पीडित व्यक्ती आधीच विवाहित असून त्याची पत्नी आपल्या दोन मुलींसह गावी राहत होती. दरम्यान, पीडित हरीषची पत्नी काही काळापासून आजारी असल्याचं सांगण्यात येत आहे. पत्नी आजारी असल्यामुळे हरीष नेहमी तिच्याशी फोनवर बोलायचा. हरीषचं पत्नीसोबत सतत बोलणं त्याच्या लिव्ह इन पार्टनरला खटकत होतं. याच कारणावरून यशमीन आणि हरीषमध्ये वारंवार वाद सुरू होते.
हे ही वाचा: Red Soil Stories: Youtube VIDEO, Shorts वर दिसणाऱ्या या 33 वर्षांच्या तरूणाच मृत्यू, कोण आहे शिरीष गवस?
छातीवर चाकूने केला वार अन्...
शनिवारच्या रात्री यशमीनने हरीषला त्याच्या पत्नीसोबत फोनवर बोलताना पाहिलं आणि त्यावेळी दोघांमध्ये मोठा वाद झाला. त्यांच्यातील हा वाद टोकाला पोहचला आणि रागाच्या भरात यशमीनने हरीषच्या छातीवर चाकूने वार केला. यामध्ये हरीष गंभीर पद्धतीने जखमी झाला आणि त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
हे ही वाचा: हनिमून करायची अन् नंतर पार्टनर बदलायची..फातिमाने 8 पुरुषांचा बाजार उठवला अन्...नागपूरमध्ये घडलं तरी काय?
हत्येचा कट रचल्याचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी हरीषचा मित्र विजय देखील त्यांच्या घरी उपस्थित होता. या प्रकरणासंबंधी हरीशच्या पुतण्याने पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारदाराच्या मते, यशमीत कौर आणि विजय या दोघांनी मिळून हरीषच्या हत्येचा कट रचला आणि त्याला खून केला. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी यशमीनला अटक केली असून चौकशीत तिने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
