नागपूर: हनिमून साजरा करायची नंतर लगेच पार्टनर बदलायची, 'तिने' 8 पुरुषांचा बाजार उठवला अन्...

Married Woman Shocking Viral News : नागपूरमध्ये एक आगळीवेगळी घटना घडल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. येथे राहणाऱ्या महिलेनं एक किंवा दोन नाही, तर आठव्यांदा विवाह करण्याचं ठरवलं.

woman changed 8 husbands celebrates honeymoon with them looted crore rupees nagpur police nabbed her
प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok
social share
google news

बातम्या हायलाइट

point

त्या महिलेनं 8 वेळा लग्न करून अनेकांना लुटलं

point

15 वर्षात कोट्यावधी रुपये लुटले अन्

point

नागपूरमध्ये घडला धक्कादायक प्रकार

Married Woman Shocking Viral News : नागपूरमध्ये एक आगळीवेगळी घटना घडल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. येथे राहणाऱ्या महिलेनं एक किंवा दोन नाही, तर आठव्यांदा विवाह करण्याचं ठरवलं. महिला आता आठवा नवरा शोधत होती, पण तिच्यासोबत असं कांड घडलं, ज्यामुळे अनेकांना हादरा बसला आहे. पण नवरीने अखेर असं केलं तरी काय? जाणून घ्या.

फातिमा असं या महिलेचं नाव आहे. शाळेत शिक्षिका म्हणून काम केलेली फातिमा सोशल मीडियाच्या माध्यमातून विवाहित पुरुषांना तिच्या जाळ्यात ओढायची. ती स्वत:ला घटस्फोटित सांगून सहानुभूती मिळवायची आणि इतर पुरुषांसोबत लग्न करायची. हनिमून झाल्यावर फातिमा त्या पुरुषाला सोडायची. त्यानंतर एक महिन्यांनी महिला ब्लॅकमेलिंग सुरु करायची. तिने असा धक्कादायक प्रकार एक किंवा दोन नाही, तर 8 विवाहित पुरुषांसोबत केला आहे. आता तिला नवा पती शोधायचा होता.

हे ही वाचा >> Red Soil Stories: Youtube VIDEO, Shorts वर दिसणाऱ्या या 33 वर्षांच्या तरूणाच मृत्यू, कोण आहे शिरीष गवस?

15 वर्षात कोट्यावधी रुपये लुटले अन्

पोलिसांना संशय होता की, तिने मागील 15 वर्षांपासून फसवणूकीचं काम केलंय. ती एकटी नाही, तर ग्रुपसोबत मिळून असे प्लॅन करत होती. पोलिसांना मिळालेल्या पुराव्यांनुसार, फातिमाने एका पीडित व्यक्तीकडून 50 लाख रुपये आणि दुसऱ्या व्यक्तीकडून 15 लाख रुपये उकळले होते. पोलिसांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला असता, ती खोटं सांगून बचाव करायची.

पण पोलिसांनी 29 जुलै रोजी नागपूरच्या एका चहाच्या टपरीवर तिला अटक केली. पोलिसांनी फातिमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि संपूर्ण नेटवर्कचा तपास सुरु आहे. या प्रकरणात इतर आरोपींचाही समावेश असू शकतो, असा संशय पोलिसांना आहे. या रॅकेटमध्ये जोडलेल्या अन्य लोकांना पोलीस लवकरच अटक करू शकतात.

हे ही वाचा >> अश्लील व्हिडीओ बनवण्यासाठी सेटिंग करायचे..उज्ज्वल-नीलूला कुठे भेटायच्या मॉडल्स? खळबळजनक माहिती समोर

हे वाचलं का?

    follow whatsapp