Red Soil Stories: Youtube VIDEO, Shorts वर दिसणाऱ्या या 33 वर्षांच्या तरूणाच मृत्यू, कोण आहे शिरीष गवस?
Red Soil Stories यूट्यूब चॅनेलचे निर्माते शिरीष गवस याचे वयाच्या 33 व्या वर्षी अचानक निधन झालं. जाणून घ्या नेमके कोण होते शिरीष गवस.
ADVERTISEMENT

सिंधुदुर्ग: कोकणातील सांस्कृतिक आणि ग्रामीण जीवनाचा सुंदर आविष्कार घडवणाऱ्या Red Soil Stories या यूट्यूब चॅनेलचा निर्माते आणि लोकप्रिय यूट्यूबर शिरीष गवस याचे वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी निधन झालंच. दरम्यान, हे वृत्त समोर आल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 1 ऑगस्ट 2025 रोजी गोव्यातील एका रुग्णालयात शिरीषने अखेरचा श्वास घेतला. मेंदूच्या गंभीर आजाराशी त्याची झुंज अपयशी ठरली. त्याच्या पश्चात त्यांची पत्नी पूजा गवस, एक वर्षाची मुलगी असा परिवार आहे.
कोण आहे शिरीष गवस?
शिरीष आणि पूजा गवस यांनी 2020 साली कोव्हिडच्या काळात मुंबईतून आपली नोकरी सोडून कोकणातील आपल्या मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडत त्यांनी महाराष्ट्र आणि गोवा सीमेवरील म्हणजेच कोकणातील एका छोट्याशा गावात नव्याने आयुष्याला सुरुवात केली होती. यावेळी त्यांनी Red Soil Stories हे यूट्यूब चॅनेल सुरू केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी कोकणातील पारंपरिक खाद्यसंस्कृती, शेती, परंपरा या गोष्टी अत्यंत सुंदर आणि साधेपणाने व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर आणल्या होत्या.
चुलीवर बनवलेले पारंपरिक पदार्थ, शेतीतील दैनंदिन कामे, कोकणातील सण-उत्सव आणि ग्रामीण जीवनातील साधेपणा हे त्यांच्या व्हिडिओजचे प्रमुख विषय असायचे. त्यांचा साधेपणा आणि कोकणी बाज हा जगभरातील मराठी चाहत्यांना आवडू लागल्याने अल्पवधीतच त्यांचे व्हिडिओ हे व्हायरल झाले होते. तेव्हापासून त्यांच्या Red Soil Stories या यूट्यूब चॅनलचे यूजर्सही प्रचंड वाढले होते.
हे ही वाचा>> 42 वर्षांची महिला लागली बॉयफ्रेंडच्या नादी, 18 आणि 16 वर्षाच्या मुलांना दिलं सोडून आणि स्वत:..
शिरीष आणि पूजाचा प्रेरणादायी प्रवास
शिरीष आणि पूजा यांनी मुंबईतील कॉर्पोरेट आयुष्य सोडून गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्यासमोर अनेक आव्हाने होती. परंतु, त्यांनी संकटाला संधीत बदलले. एका चिनी ब्लॉगरच्या व्हिडीओमधून प्रेरणा घेऊन त्यांनी आपलं Red Soil Stories चॅनल सुरू केलं होतं. ज्यामध्ये पूजा गवस ही कोकणातील खाद्यसंस्कृतीमधील पारंपरिक पदार्थ बनवून दाखवायची तर शिरीष शूटिंग आणि इतर गोष्टी पाहत असे..










