रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गात मान्सूनचा वेग मंदावला, पश्चिम महाराष्ट्रात नेमकी काय स्थिती?

Maharashtra Weather : राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा वेग कमी होण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे. खालीलप्रमाणे सविस्तर हवामान अंदाज आणि त्याचे परिणाम याबाबत माहिती दिली आहे.

maharashtra weather (grok)

maharashtra weather

मुंबई तक

• 06:00 AM • 04 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्यातील हवामानाची महत्त्वाची अपडेट

point

4 ऑगस्ट रोजी राज्यातील वातावरण

point

(IMD) विभागाचा अंदाज

हे वाचलं का?

Maharashtra Weather : भारतीय हवामान खात्याच्या (IMD) विभागाच्या अंदाजानुसार, 4 ऑगस्ट 2025 रोजी राज्यातील एकूण हवामानाबाबत विविधतेची शक्यता वर्तवलेली आहे. मान्सूनचा जोर कायम असला तरी राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा वेग मंदावल्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. खालीलप्रमाणे सविस्तर हवामान विभागाच्या अंदाजाबाबात माहिती दिली आहे.

हे ही वाचा : 'तुमची जातच तशी, किती जणांसोबत झोपलात, रां## की...?', पीएसआयकडून तरुणींवर गंभीर आरोप, पुण्यात नेमकं काय घडलं?

कोकण : 

कोकण किनारपट्टीवर, विशेषतः रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये, 4 ऑगस्ट रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि ठाणे येथे ढगाळ वातावरण राहील, परंतु मुसळधार पावसाची हवामान विभागाने शक्यता वर्तवली नाही. तसेच हवेची आर्द्रता जास्त राहिल्याने उकाड्यात वाढ निर्माण होईल, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. 

पश्चिम महाराष्ट्र :

पश्चिम महाराष्ट्रातील  पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथे हवामान विभागाने हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर पुण्यातील तापमान 28 ते 32 अंश सेल्सिअस दरम्यान असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे उकाड्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. तसेच सांगली आणि सोलापूर येथे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. 

विदर्भ : 

विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ येथे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे, ज्यामुळे स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हे ही वाचा : "शिवछत्रपतींच्या रायगडमध्ये डान्सबार?' राज ठाकरेंचा प्रश्न आणि मनसैनिक पनवेलच्या रस्त्यावर, 'नाईट रायडर्स' डान्स बारची तोडफोड

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र 

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी येथे ढगाळ वातावरण राहील, परंतु पाऊस हलक्या स्वरूपाचा असेल. तर काही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव येथील तापमान 30 ते 34 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. तसेच हलक्या पावसाची शक्यता आहे, परंतु उष्ण आणि दमट वातावरण कायम राहण्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे.  

    follow whatsapp