Pune: 'किती जणांसोबत झोपलात, रां## की...?', मुजोर PSI चं तरुणींसोबत घाणेरडं वर्तन; नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Pune news : पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात तीन निष्पाप मुलींवर जातीवाचक वक्तव्य करत बेदम मारहाण करण्यात आली. एवढेच नाही,तर त्यांच्या चारित्र्यावरही संशय घेण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

pune news
pune news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पीएसआयकडून तरुणींना जातीवाचक शिवीगाळ

point

चारित्र्यावरही घेण्यात आला संशय

point

कोथरूडमध्ये नेमकं काय घडलं?

Pune news : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुणे शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात तीन निष्पाप मुलींवर जातीवाचक वक्तव्य करत बेदम मारहाण करण्यात आली. एवढेच नाही,तर त्यांच्या चारित्र्यावरही संशय घेण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरची एक मुलगी सासरच्या त्रासाला कंटाळून तीन मुलींकडे एका दिवसासाठी राहण्यास आली होती. तरुणी हरवल्याची तक्रार ही संभाजीनगर येथील एका पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी संबंधित मुलीचा मोबाईल ट्रॅक केला आणि तिचं लोकेशन पुणे आढळून आलं.

त्यानंतर पोलिसांनी संबंधित तिघींच्या फ्लॅटवर जाऊन एकूण चौकशी केली. यानंतर पोलिसांनी पीडित तरुणींना ताब्यात घेतलं आणि कोथरूड पोलीस ठाण्यात नेलं. त्यानंतर त्या तिन्ही मुलींना शारीरिक मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला. कोथरूड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील आणि छत्रपती संभाजीनगरचे उपनिरीक्षक कामटे यांनी या तिन्ही मुलींना जातीवाचक वक्तव्य केलं. तसेच शिवीगाळही करण्यात आल्याचा आरोप श्वेता एस यांनी केला आहे. 

संबंधित प्रकरणात सोशल मीडियावरील फेसबुकवर श्वेता एस. यांनी एक व्हिडिओ शेअर केला. पोलिसांनी पीडित तरुणींच्या चारित्र्यावर संशय निर्माण केला. तसेच काही अपमानजनक शब्दही वापरले होते, तसेच तोकडे कपडे घालण्यावरून गंभीर आरोप केले आहेत, असा श्वेता एस यांचा आरोप आहे. त्यानंतर श्वेता पुढे म्हणाल्या की, पीएसआय कामटे यांनी मुलीला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली आणि तिच्या शरीराला चुकीचा स्पर्श केला. तिन्ही मुली पुण्यातील कोथरूडमध्ये राहतात आणि नोकरी करतात. मिसिंग केसेसची चौकशी पोलिसांनी या मुलींकडे केली, असे श्वेता एस यांनी सांगितलं.

सुप्रिया सुळेंनी घेतली दखल 

संबंधित प्रकरणाची दखल आता खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता, दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. संबंधित प्रकरणाचा व्हिडिओ एका व्हॉट्सअॅपद्वारे समोर आला. संबंधित व्हिडिओ हा या प्रकरणाच्या संदर्भातच असेल तर ही गंभीर घटना आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेकडं गंभीर्य बाळगून लक्ष घ्यावं. संबंधित प्रकरणाची एकूण चौकशी करूनच पुढील चौकशी करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp