Govt Job: इंडियन एअरफोर्समध्ये नोकरीची मोठी संधी! लाखोंच्या घरात मिळणार पगार... कधीपासून कराल अर्ज?

भारतीय हवाई दलाकडून AFCAT 2025 या भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. या भरतीमध्ये फ्लाइंग ऑफिसर, टेक्निकल आणि ग्राउंड ड्यूटी ब्रांचमध्ये उमेदवारांची नियुक्ती केली जाते.

इंडियन एअरफोर्समध्ये नोकरीची मोठी संधी!

इंडियन एअरफोर्समध्ये नोकरीची मोठी संधी!

मुंबई तक

• 02:33 PM • 07 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

इंडियन एअरफोर्समध्ये नोकरीची मोठी संधी!

point

लाखोंच्या घरात मिळणार पगार...

point

कधीपासून कराल अर्ज?

Govt Job: सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असणाऱ्या तरुणांसाठी भारतीय हवाई दलात नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय हवाई दलाकडून  AFCAT 2025 या भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. या भरतीमध्ये फ्लाइंग ऑफिसर, टेक्निकल आणि ग्राउंड ड्यूटी ब्रांचमध्ये उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबर 2025 रोजी सुरू होणार असल्याची माहिती आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार afcat.cdac.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. 

हे वाचलं का?

काय आहे पात्रता? 

भारतीय हवाई दलाच्या AFCAT 2025 या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारासाठी किमान वय 20 वर्षे आणि कमाल 24 वर्षे अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यापैकी, फ्लाइंग ब्रांच पदासाठी कमी वय असलेल्या उमेदवारांचीच निवड केली जाणार आहे. तसेच, भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं नॉन टेक्निकल ब्रांचमध्ये कोणत्याही विषयात ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, ग्रॅज्युएशनमध्ये किमान 50 टक्के गुण असणं गरजेचं आहे. तसेच, टेक्निकल ब्रांचसाठी किमान 60 टक्के गुणांसह B.Tech किंवा BE डिग्री उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. 

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करण्यासाठी सर्व प्रवर्गातील उमेदवारांना 550 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. यासाठी कोणतीही सूट देण्यात येणार नाही. 

कशी होणार निवड? 

या भरतीच्या माध्यमातून उमेदवारांची चार टप्प्यांतून निवड केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना आधी लेखी परीक्षेत उत्तीर्ण व्हावं लागेल. त्यानंतर, लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना SSB इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. हा टप्पा पाच दिवस कालावधीचा असल्याची माहिती आहे. त्यानंतर, डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच उमेदवारांचा दस्तऐवजांची तपासणी होईल. शेवटी, मेडिकल चाचणी उत्तीर्ण व्हावी लागेल. ही मेडिकल टेस्ट इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन मेडिसिन, बंगळुरू आणि एअरफोर्स सेंट्रल मेडिकल इस्टाब्लिशमेंट, नवी दिल्ली या दोन ठिकाणीच घेतली जाणार आहे. 

पहिल्या टप्प्यातील लेखी परीक्षा 300 गुणांची असून त्यासाठी 2 तासांचा कालावधी दिला जाईल. यामध्ये सामान्य ज्ञान, इंग्रजी, बुद्धिमत्ता, अंकगणित आणि मिलिट्री अॅप्टिट्यूड या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 3 गुण असून चुकीचं उत्तरासाठी 1 गुणाचं निगेटिव्ह मार्किंग असेल. 

हे ही वाचा: प्रियकरासोबत मिळून रचला पतीच्या हत्येचा कट! पिस्तूलने गोळ्या झाडल्या अन्... अनैतिक संबंधातून धक्कादायक घटना

किती मिळेल पगार? 

  • बेसिक पे: दरमहा 56,100 ते 1,77,500 रुपये
  • प्रमोशन झाल्यानंतर, स्क्वाड्रन लीडर पदासाठी: दरमहा 69,400 से 2,07,200 रुपये
  • विंग कमांडर झाल्यानंतर: दरमहा 1,21,200 ते 2,12,400 रुपये
  • ग्रुप कॅप्टन पदासाठी: दरमहा 1,30,600 से 2,15,900 रुपये 
  • एअर मार्शल: दरमहा 2,25,000 रुपयांपर्यंत 
  • चीफ ऑफ एअर स्टाफ: दरमहा 2,50,000 रुपये 

याशिवाय, इतर सरकारी भत्ते 

हे ही वाचा: "गोळ्या देऊन किंवा औषधे देऊन घातपात..." हत्येच्या कटाबाबत मनोज जरांगेंनी थेट घेतलं धनंजय मुंडेंचं नाव!

कसा कराल अर्ज? 

1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम afcat.cdac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
2. त्यानंतर, AFCAT 2025 लिंकवर क्लिक करा. 
3. फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरा. 
4. आता, पासपोर्ट साइझ फोटो, सही आणि मार्कशीट स्कॅन करून डॉक्यूमेंट्स अपलोड करा. 
5. 550 रुपये ऑनलाइन फी भरा. 
6. फॉर्म सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढून भविष्यासाठी ती सुरक्षितरित्या ठेवा. 
 

    follow whatsapp