Govt Job: 'बँक ऑफ बडोदा'मध्ये तब्बल 2700 पदांसाठी भरती! तरुणांनी अजिबात संधी सोडू नका...

बँक ऑफ बडोदा (BOB) कडून अप्रेन्टिसशिपच्या तब्बल 2700 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

तरुणांनी अजिबात संधी सोडू नका...

तरुणांनी अजिबात संधी सोडू नका...

मुंबई तक

• 01:31 PM • 12 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

'बँक ऑफ बडोदा'मध्ये तब्बल 2700 पदांसाठी भरती!

point

तरुणांनी 'ही' संधी अजिबात सोडू नका...

Govt Job: बँकेत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) कडून अप्रेन्टिसशिपच्या तब्बल 2700 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 11 नोव्हेंबर 2025 रोजी सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार 1 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. 

हे वाचलं का?

या भरतीसाठी उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. बँकिंग क्षेत्रात कामाचा अनुभव आणि भविष्यात सरकारी बँकेत मोठ्या पदावर नोकरीच्या दृष्टीने उमेदवारांसाठी ही चांगली संधी उपलब्ध झाली आहे. 

पात्रता आणि वयोमर्यादा 

बँक ऑफ बडोदामध्ये अप्रेन्टिसशिप पदासाठी अर्ज करणासाठी उमेदवाराकडे भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी (ग्रॅज्युएशन) ची डिग्री असणं आवश्यक आहे. तसेच, या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांसाठी किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. एससी (SC) आणि एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, ओबीसी (OBC) प्रवर्गातील 3 वर्षे तसेच, अपंग उमेदवारांना 10 वर्षे उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे. 

निवड प्रक्रिया 

या भरतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड तीन टप्प्यांत केली जाणार आहे. यामध्ये, ऑनलाइन लेखी परीक्षा, डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन आणि स्थानिक भाषा चाचणी यांचा समावेश आहे. 

लेखी परीक्षेत एकूण 100 गुणांसाठी बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. यामध्ये सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता, संगणकाचं बेसिक नॉलेज आणि इंग्रजी विषयांवर आधारित प्रश्न विचारण्यात येतील. तसेच, लेखी परीक्षेचा कालावधी 1 तासांचा असणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन आणि स्थानिक भाषा चाचणी द्यावी लागेल. त्यानंतर, उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल. 

हे ही वाचा: Govt Job: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात नोकरीची सुवर्णसंधी! मोठ्या पदांसाठी निघाली भरती... काय आहे पात्रता?

अर्जाचं शुल्क 

अप्रेन्टिसशिप पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना त्यांच्या प्रवर्गानुसार, शुल्क भरावं लागेल. सामान्य (Open), ओबीसी (OBC) आणि ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गातील उमेदवारांना उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 800 रुपये शुल्क भरावं लागेल. तसेच, अपंग उमेदवारांना 400 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं असून एससी (SC) आणि एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांना अर्जाच्या शुल्कात पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. बँकेत अप्रेन्टिसशिप करणाऱ्या उमेदवारांना दरमहा 15,000 रुपये स्टायपेंड दिलं जाईल. 

हे ही वाचा: Delhi Blast: डॉ. मुझम्मिलसोबत प्रेमसंबंध! पतीपासून घेतला घटस्फोट, डॉ. शाहीन शाहीदचं महाराष्ट्रातील कनेक्शन आलं समोर...

कसा कराल अर्ज? 

1. सर्वप्रथम 'बँक ऑफ बडोदा'च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
2. त्यानंतर, उमेदवारांनी 'Apprentice Recruitment 2025'च्या लिंकवर क्लिक करा. 
3. आता, उमेदवारांची आवश्यक माहिती भरून रजिस्ट्रेशन करून घ्या. 
4. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर, फॉर्ममध्ये शैक्षणिक माहिती भरा. 
5. नंतर, महत्त्वाचे डॉक्यूमेंट्स अपलोड करा. 
6. अर्जाचं शुल्क भरून फॉर्म सबमिट करा. 
7. शेवटी, अर्जाची प्रिंटआउट काढून भविष्यासाठी ती सुरक्षितरित्या ठेवा. 

    follow whatsapp