Govt Job: बँक ऑफ बडोदा (BOB) कडून नवी भरती जाहीर करण्यात आली आहे. BOB ने असिस्टंट मॅनेजर, उपव्यवस्थापक, सायबर सिक्योरिटी रिस्क इ. पदांसाठी भरतीचं अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. या भरतीअंतर्गत विविध पदांवर एकूण 330 उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 15 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करु शकतात. म्हणजेच या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांनी त्वरीत अर्ज करण्यासाठी सुरूवात करावी. उमेदवार www.bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.
ADVERTISEMENT
काय आहे पात्रता?
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांकडे भारतातील मान्यताप्राप्त संस्थेतून कंप्यूटर साइन्स (CS) मध्ये ग्रॅज्यूएशन तसेच बीई (B.E), बीटेक (B.Tech), एमई (M.E), एमटेक (M.Tech) किंवा कंप्यूटर साइन्स (CS) मध्ये एमएससी (MSc) पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पदांनुसार उमेदवारांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. पदांनुसार उमेदवारांचं किमान वय 22, 23, 24, 25, 26, 27 28, 30, 31 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे. तसेच, कमाल वय 32, 34, 35, 40, 41, 45, 35, 36, 38, 48 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त, सरकारी नियमांनुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. एससी (SC), एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे आणि अपंग उमेदवारांना 10 वर्षे उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.
हे ही वाचा: कुऱ्हाडीने गळा चिरला अन् नंतर छातीवर वार... संतापलेल्या पतीने झोपलेल्या अवस्थेत पत्नीची केली हत्या!
अर्जाचं शुल्क
या भरतीकरता अर्ज करण्यासाठी उमेदवारांना निश्चित शुल्क सुद्धा भरावं लागेल. सामान्य (General), ओबीसी (OBC) आणि ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गातील उमेदवारांना 850 रुपये आणि एससी (SC), एसटी (ST), अपंग आणि महिला उमेदवारांना 175 रुपये अर्जाचं शुल्क भरावं लागेल. शॉर्टलिस्टिंग प्रक्रिया आणि मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल.
हे ही वाचा: मुंबईतील उच्चभ्रू इमारतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; 35 वर्षीय शेजाऱ्याने पार्किंग लॉटमध्ये नेलं अन्...
कसा कराल अर्ज?
सर्वप्रथम www.bankofbaroda.in या बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
होमपेजवरील 'Careers' सेक्शनमध्ये जाऊन 'Current Opportunities' वर क्लिक करा.
त्यानंतर BOB/HRM/REC/ADVT/2025/09 हा जाहिरातीचा नंबर शोधून 'Apply now' लिंकवर क्लिक करा.
रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरुन झाल्यानंतर त्यात रेझ्युमेसह आवश्यक डॉक्यूमेंट्स अपलोड करा.
त्यानंतर अर्जाचं शुल्क भरुन फॉर्म सबमिट करा.
ADVERTISEMENT
