Shocking Viral News : तेलंगणामध्ये एका धक्कादायक घटनेमुळं मोठी खळबळ उडाली आहे. येथील 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह 40 वर्षांच्या एका शिक्षकासोबत झाला. ही घटना रंगा रेड्डी येथे घडली. मुलीला तिच्या आईनेच लग्नासाठी तयार केलं आणि आरोपीने पहिल्या पत्नीसमोरच सातफेरे घेतले.
ADVERTISEMENT
धक्कादायक बाब म्हणजे, लग्न मे महिन्यातच झालं होतं. पण हे प्रकरण तेव्हा समोर आलं, जेव्हा मुलीनं शिक्षकाला सर्वकाही सांगितलं. मुलीच्या शिक्षकानं तातडीनं जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीनला आरोपीच्या पिंजऱ्यातून सोडवलं आणि तिला सखी सेंटरमध्ये शिफ्ट केलं. जिथे तिचं समुपदेशन केलं जात आहे.
आई आणि एजंटने लग्न जुळवलं होतं
पोलीस तपासात समोर आलं की, पीडिता तिची आई आणि भावासोबत भाड्याच्या घरात राहत होती. आईनं घरमालकाला सांगितलं की, तिला तिच्या मुलीचं लग्न करायचं आहे. त्यानंतर एका एजंटने 40 वर्षीय श्रीनिवास गौडसोबत लग्नाची बोलणी केली होती. मे महिन्यात आरोपीच्या पहिल्या पत्नीसमोरच हे लग्न लावण्यात आलं होतं.
हे ही वाचा >> Breaking News: राष्ट्रवादीत मोठी खळबळ! माणिकराव कोकाटेंबाबत 'हा' निर्णय झाला, स्वत: अजित पवारांनीच CM फडणवीसांना सांगितलं तुम्ही...
दोन महिने राहत होते एकत्र
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी प्रवीण कुमार यांनी म्हटलं की, अल्पवयीन मुलगी मागील दोन महिन्यांपासून आरोपीसोबत राहत होती. जर तपासात हे सिद्ध झालं की, शारीरिक संबंध करण्यासाठी मजबूर केलं आहे, तर आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल.
दरम्यान, पोलिसांनी आरोपी पुरुष, त्याची पहिली पत्नी, पीडितेची आई, लग्न करणारा एजंट आणि विवाह करणाऱ्या पूजाऱ्याला बालविवाह प्रतिबंध अधिनियमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडितेला सखी सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. तिची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी तज्ज्ञांची टीम समुपदेशन करत आहेत. प्रशासनाने आरोपी विरोधात कठोर कारवाईचं आश्वासन दिलं आहे.
हे ही वाचा >> 'तो' गर्लफ्रेंडसोबत दारू प्यायला..नंतर प्रायव्हेट पार्टमध्ये हात टाकून तिचा खून केला अन्..हादरंवून टाकणारी घटना!
ADVERTISEMENT
