Married Woman Shocking Viral News : उत्तरप्रदेशच्या सहारनपूरमध्ये दोन मुलं असलेली महिला तरुण प्रियकरासोबत पळून गेली. आई प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर तिची मुलं खूप टेन्शनमध्ये होती. तसच त्या महिलेनं घरातील लाखो रूपये आणि दागिनेही सोबत नेल्याचं मुलांनी पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी मुलांच्या तक्रारीनुसार याप्रकरणी तपास सुरु केला आहे.
ADVERTISEMENT
रिपोर्टनुसार, सहारनपूरच्या गंगोह पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 42 वर्षांच्या विधवा महिलेनं दोन मुलांना घरीच सोडलं आणि प्रियकरासोबत पळून गेली. घरातील सर्व दागिने आणि जवळपास 3 लाख रुपयांची रोख रक्कमही ती सोबत घेऊन गेली. महिलेचा प्रियकर आणि आणि त्याच्या तीन मैत्रिण आता मुलांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत. पीडित मुलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून न्यायाची मागणी केली आहे.
आईच्या मैत्रिणींनी दोन्ही मुलांना दिली धमकी
पतीचं निधन झाल्यानंतर त्या महिलेचं अफेअर मुजफ्फरनगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणासोबत सुरु झालं. काही दिवसांपूर्वी ती महिला तिच्या मैत्रिणींसोबत पंजाबला गेली होती. त्यानंतर याच महिलांनी त्या मुलांना खोट्या केसमध्ये फसवण्याची धमकी दिली होती.
मुलांनी पोलीस ठाण्यात दाखल केली तक्रार
याप्रकरणी पीडित मुलांनी आरोपींविरोधात कारवाई करण्याची मागणी केलीय. दोन्ही मुलांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांची आई 25 जुलै रोजी तिच्या प्रियकरासोबत अचानक घरातून गायब झाली. तिने घरातील दागिने आणि पैसेही नेले. आता तिचा प्रियकर जीवे मारण्याची धमकी देत आहे. आरोपीला घरातील सामान आणि वडिलांच्या नावावर असलेल्या संपत्तीवर कब्जा करायचा आहे.
ADVERTISEMENT
