Rape Case: प्रशासनाकडून मुलींच्या सुरक्षिततेचा विचार करुन कठोर पावलं उचलण्यात येत असली तरीसुद्धा महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. अशीच एक संतापजनक आणि लाजिरवाणी घटना झारखंडमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. राजधानी रांचीमधील रुग्णालयात एका 14 वर्षीय शाळकरी मुलीने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT
अल्पवयीन पीडितेसोबत घृणास्पद कृत्य
गुमला जिल्ह्यातील बसिया गावात राहणाऱ्या अल्पवयीन पीडितेसोबत त्याच गावात राहणाऱ्या एका तरुणाने घृणास्पद कृत्य केलं होतं. समाजाची भिती आणि आरोपींनी दिलेल्या धमक्यांमुळे अल्पवयीन पीडिता आणि तिच्या कुटुंबियांनी याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली नाही. मात्र, आरोपीच्या दुष्कृत्यामुळे 14 वर्षीय पीडिता गरोदर राहिली आणि सामाजिक अपमानाला घाबरुन पीडिता आणि तिचे कुटुंबीय गुमला जिल्ह्यातून रांचीला गेले.
हे ही वाचा: बापरे..! अमरावतीत दहा वर्षीय मुलीच्या पोटातून काढला अर्धा किलो केसांचा गोळा, डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक सत्य
पोलिसांना दिली माहिती
रांचीच्या एका रुग्णालयात पीडितेने एका बाळाला जन्म दिला. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता सदर रुग्णालय व्यवस्थापनाने रांचीच्या लोअर बाजार पोलिस स्टेशनमध्ये संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. अल्पवयीन पीडितेने दिलेल्या जबाबाच्या आधारे, रांचीच्या लोअर बाजार पोलिस ठाण्यात झीरो एफआयआर नोंदवण्यात आला. त्यानंतर गुमला जिल्ह्यातील बसिया पोलिस ठाण्याच्या पोलिसांना या प्रकरणाबद्दल सूचना देण्यात आली.
हे ही वाचा: Breaking News: राष्ट्रवादीत मोठी खळबळ! माणिकराव कोकाटेंबाबत 'हा' निर्णय झाला, स्वत: अजित पवारांनीच CM फडणवीसांना सांगितलं तुम्ही...
पीडित मुलीचा जबाब
त्यानंतर, गुमला जिल्ह्याचे एसपी यांच्यासह पोलीस पथकाने अल्पवयीन पीडितेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली शिवा अहिर नावाच्या तरुणाला अटक केली आहे. पीडित मुलगी शाळेत जाताना आणि तिथून येताना आरोपी तिचा विनयभंग करत असल्याचं तिने सांगितलं. त्यानंतर एके दिवशी आरोपीने पीडितेवर बलात्कार केला आणि याबद्दल कोणालाही सांगितल्यास वाईट परिणाम होतील, अशी धमकी दिली. यामुळे पीडिता गप्प राहिली आणि तिच्यासोबत झालेल्या घाणेरड्या कृत्याबद्दल तिने कोणालाच काही सांगितलं नाही. पोलिसांनी आरोपीविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून त्याच्यावर पुढील कारवाई केली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
