Govt Job: भारत सरकारच्या केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषद या मोठ्या संस्थेत सहभागी होण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च होमिओपॅथी (CCRH)कडून ग्रुप-A, B आणि C या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जाची प्रक्रिया 5 नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे. CCRH मध्ये रिसर्च ऑफिसर, जूनिअर लायब्रेरिअन किंवा एक्स-रे टेक्निशिअन म्हणून काम करण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरतीच्या माध्यमातून एकूण 90 उमेदवारांची निवड केली जाणार असून पात्र उमेदवार 26 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
CCRH च्या ग्रुप-A, B आणि C पदांवर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 12 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, याव्यतिरिक्त, उमेदवारांकडे संबंधित विषयात पदवी (ग्रॅज्युएशन) किंवा पदव्युत्तर (पोस्ट ग्रॅज्युएशन) डिग्री असणं गरजेचं आहे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पदांनुसार उमेदवारांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. पदांनुसार, 18 वर्षे, 25 वर्षे, 27 वर्षे आणि 40 वर्षे अशी कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. म्हणजेच एससी (SC) आणि एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे आणि अपंग उमेदवारांना 10 वर्षे उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
हे ही वाचा: "माझ्याशी चॅट करा अन् कोणत्याही समस्येपासून सुटका मिळवा..." इंस्टाग्रामवर असं बोलून लुबाडले तब्बल 78 लाख!
कशी होईल निवड?
1. ग्रुप-A पदावर उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी कंप्यूटर बेस्ट टेस्ट (CBT) आयोजित केली जाईल. यामध्ये उमेदवारांना एकूण 150 प्रश्न विचारले जातील. त्यानंतर, लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांची 30 गुणांसाठी मुलाखत घेतली जाईल. याच आधारे उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.
2. ग्रुप-B आणि C पदांसाठी कंप्यूटर बेस्ट टेस्ट (CBT) च्या आधारे उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. या टेस्टमध्ये उमेदवारांना 100 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.
3. लेखी परीक्षेत प्रत्येक योग्य उत्तरासाठी एक गुण आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश निगेटिव्ह मार्किंग असेल.
हे ही वाचा: लिव्ह-इन-रिलेशनशिपचा भयानक अंत! पतीला सोडून प्रियकराकडे गेली अन्... अखेर ट्रॉली बॅगेत सापडला मृतदेह
अर्जाचं शुल्क
संबंधित पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्जाचं शुल्क भरणं अनिवार्य आहे. गट-A पदांसाठी अर्ज करण्यासाठी जनरल (Open), ओबीसी (OBC) आणि ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आलं आहे तसेच गट-B आणि C पदांसाठी अर्ज करण्यासाठी 500 रुपये निश्चित अर्ज शुल्क करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, एससी (SC), एसटी (ST) प्रवर्गातील तसेच अपंग आणि महिला उमेदवारांसाठी अॅप्लिकेशन फीमध्ये सूट देण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT











