Govt Job: सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. न्युक्लिअर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) कडून 10 वी उत्तीर्ण ते डिप्लोमा/ ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 15 जानेवारी रोजी या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी उमेदवार npcilcareers.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT
वयोमर्यादा
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी पदानुसार, 10 वी उत्तीर्ण, ITI किंवा संबंधित क्षेत्रात डिप्लोमा/ ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे. यासोबतच, उमेदवारांसाठी 18 वर्षे ते 30 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून 4 फेब्रुवारी 2026 तारखेच्या आधारे उमेदवारांच्या वयाची गणना केली जाईल. तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आधी ऑनलाइन माध्यमातून npcilcareers.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल. त्यासोबतच, उमेदवारांना अर्जाचं निश्चित शुल्क भरावं लागेल. 15 जानेवारी 2026 रोजी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून उमेदवार 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज करू शकतात.
हे ही वाचा: आई-वडिलांसह कुटुंबातील लोकांना झोपेच्या गोळ्या द्यायची अन् रात्री बॉयफ्रेंडसोबत... 8 वीत शिकणाऱ्या मुलीचा धक्कादायक प्रताप
अर्जाचं शुल्क
1. अर्ज शुल्क श्रेणी-I - स्टायपेंडरी ट्रेनी/ (एसटी/ एसए) - इंजीनिअरिंग/ विज्ञान शाखेत धारक पदवीधर/ वैज्ञानिक सहाय्यक/ ब (सिव्हिल) पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 150 रुपये शुल्क भरावं लागेल.
2. तसेच, एक्स-रे टेक्निशियन (टेक्निशियन-सी)/ असिस्टंट ग्रेड-1 (एमएएस)/ असिस्टंट ग्रेड-1 (वित्त आणि लेखा)/ असिस्टंट ग्रेड-1 (सी अँड एमएम)/स्टायपेंडरी ट्रेनी/ (एसटी/टीएन) श्रेणी-II साठी 100 रुपये आहे.
3. या भरतीसाठी अनुसूचित जाती/ जमाती/ माजी सैनिक/ अपंग आणि महिला मोफत अर्ज करू शकतात.
हे ही वाचा: अहिल्यानगर : कंदुरीच्या कार्यक्रमात मित्रांमध्ये वाद, बोकड कापण्यासाठी आलेल्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या
कशी होणार निवड?
या भरतीमध्ये नियुक्त होण्यासाठी, उमेदवारांना काही पदांसाठी ऑनलाइन परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखत तसेच, इतर काही पदांसाठी ऑनलाइन परीक्षा (प्राथमिक आणि प्रगत) आणि उर्वरित पदांसाठी लेखी परीक्षा (प्राथमिक आणि मुख्य) सह कौशल्य चाचणीत उत्तीर्ण व्हावं लागेल. या भरतीसंबंधी अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत नोटिफिकेशन तपासू शकतात.
ADVERTISEMENT











